Published Dece 16, 2024
By Chetan Bodke
Pic Credit- Instagram
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
नुकतंच दिवंगत चित्रपट निर्माते-अभिनेता राज कपूर यांच्या १०० व्या बर्थडेनिमित्त शुक्रवारी रात्री मुंबईत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमानिमित्त आलियाने व्हाईट साडी नेसली होती. या कार्यक्रमानिमित्त अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट शेअर केलेय.
शेअर केलेल्या फोटोंमधील आलियाच्या साडीतील हटके लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या ह्या लुकवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.
यावेळी आलियाने व्हाईट कलरच्या साडीमध्ये मेकअप खूपच युनिक केला होता. अभिनेत्रीने केलेला लूक खूपच नॅचरल दिसत होता.
मेकअपबद्दल बोलायचं तर, आलियाने ग्लॉसी टच देऊन तिने हा लुक पूर्ण केला होता. यावेळी आयलायनर नॅचरल बेस असलेली लिपस्टिक लावून तिने हा लूक पूर्ण केला.
आलियाने गळ्यात रिंपल मोत्याची माळ कॅरी केली होती. तर एक अंगठी कॅरी करत हा लुक पूर्ण केला होता.
.
आलियाने शेअर केलेल्या लुकवरून नेटकऱ्यांची नजर हटत नाही आहे. आलियाचे सौंदर्य सर्वांचे मनात बसले.
.