Published Nov 26,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Adobe Stock
एक कप तयार केलेली कॉफी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा दालचिनी पावडर,
चिमूटभर काळी मिरी, एक टीस्पून खोबरेल तेल आणि एक कप बदाम दूध
कॉफी पावडरमध्ये उकळते पाणी घाला आणि 2-3 मिनिटात ब्लॅक कॉफी तयार करा
एका बाउलमध्ये हळद, दालचिनी पावडर आणि काळी मिरी घ्या. ते मिक्स करा आणि तयार केलेल्या कॉफीमध्ये घाला.
क्रीमी texture साठी त्यात 1 टीस्पून खोबरेल तेल घाला, गोडासाठी मध घाला
आता कॉफीमध्ये कोमट बदामाचे दूध घालून चांगले फेटून घ्या. वजन कमी करण्यासाठी ते गरम करा आणि दररोज एक कप प्या.
.
मात्र, तुम्हाला कॉफी किंवा हळदीची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.