डंकी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांसाठी स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. भारतीय सेन्सॉर बोर्डासमोर झालेल्या स्क्रीनिंगमध्ये डंकीला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. आता प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. त्याची रिलीज डेट जाहीर झाली आहे. निर्माते त्याचे शूटिंग लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यानंतर ते सिनेमाचं पोस्ट प्रॉडक्शनही पूर्ण करतील. अल्लू अर्जुनला पहिल्या भागासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित...
शाहरुख खानची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित जवान सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. एकाहून एक दमदार ॲक्शन सीन, शाहरुखचा खलनायक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या सोशल मीडियावर हा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी सीमा देव यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारानं मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं.
10 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या जेलर सिनेमाने 10 दिवसांत जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने 245.9 कोटींची कमाई केली आहे, त्यापैकी केवळ दक्षिण पट्ट्यात या सिनेमाने 5 दिवसांत 134 कोटींची कमाई केली आहे.
बँक ऑफ बडोदाने अभिनेता सनी देओलच्या जुहू इथल्या बंगल्याच्या लिलावाची नोटीस 24 तासांत मागे घेतली. बँकेने सोमवारी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत तांत्रिक कारणांमुळे ही नोटीस मागे घेतली जात असल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे सनी देओलच्या मालमत्तेचा लिलाव होणार नाही असंही सांगण्यात आलं आहे.
'गदर 2' ने पहिल्या दिवसापासूनच थिएटरमध्ये गर्दी जमवायला सुरुवात केली आहे. तारा सिंगच्या पुनरागमनाने बॉक्स ऑफिसवर असा धमाका केला आहे. 22 वर्षांनंतर आलेला सिक्वेल पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी थिएटरबाहेर लाइन लागल्याचं पाहायला मिळालं. 'गदर 2' ने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक ओपनिंग केलं आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांचा जेलर सिनेमा रिलीज झाला आहे. हा सिनेमा ब्लॅक कॉमेडी Action सिनेमा आहे. रजनीकांत एका कडक जेलरच्या भूमिकेत आहे. सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकींगने धुमाकूळ घातला आहे. सुमारे 14.18 कोटींचं ॲडव्हान्स बुकींग जेलर सिनेमाचं झालेलं आहे. जवळपास 900 थिएटरमध्ये सिनेमा रिलीज झालेला आहे. पहि...
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर शुक्रवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार केले जातील.
चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. कला दिग्दर्शक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. कर्जत इथल्या त्यांच्या एन.डी.स्टुडिओमध्ये त्यांनी आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे चित्रपटसृष्टी हादरून गेली आहे. दापोली ते जागतिक सिनेमापर्यंत मजल म...
मुसळधार कोसणाऱ्या पावसामुळे लोकलसेवा ठप्प झालेली आहे. त्यामुळे प्रवाशाचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच कल्याण-ठाकुर्ली रेल्वे स्टेशनादरम्यान एक दुर्वैवी घटना घडलीय. लोकलमधून उतरून पावसातून वाट काढताना एका आईने आपल्या 4 महिन्यांच्या लेकराला गमावलं.
कल्याण-डोंबिवली परिसरात तुफान पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्यातच आता लोकलसेवाही ठप्प झाल्याने संध्याकाळी ऑफिसवरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकात पॉईंट फेल झालाय.
महाराष्ट्रातील राजयकी उलथापालथीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मोठं व्यक्तव्य केले आहे आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील असा दावा संजय राऊतांनी केला आहे.