www.navarashtra.com

By Nupur Bhagat

चायनीज सामोसा खाल्ला आहे का? नोट करा रेसिपी

Pic Credit -   Pinterest

Published 11 Feb, 2025

तोच तोच बोरिंग सामोसा सोडा आणि यावेळी घरी ट्राय करा चायनीज सामोसा

चायनीज सामोसा 

नूडल्स, कांदा, शिमला मिरची, मीठ, तेल, सोया सॉस, रेड चिली सॉस, आले-लसूण पेस्ट, काळी मिरी पावडर, मैदा, ओवा इ.

साहित्य

यासाठी प्रथम मैद्याच्या पिठात ओवा आणि मीठ घाला आणि थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या

पीठ मळा

आता गॅसवर कढई ठेवून यात तेल घाला आणि यात सर्व भाज्या छान परतून घ्या

भाज्या परता

आता यात मीठ, काळी मिरी पावडर, आले लसूण पेस्ट आणि इतर सॉस घालून मिक्स करा

सॉस 

आता मैद्याच्या पिठाच्या पोळ्या लाटून घ्या

पोळ्या लाटा

पोळीला मधून कापून दोन भाग करा आणि त्याचा त्रिकोण तयार करत यात स्टफिंग भरा

सारण भरा

तयार सामोसे तेलात मध्यम आचेवर तळा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा

तळा