ह्युंदाईची भारतासाठी पहिली MPV येणार; टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला मिळणार नवी स्पर्धा

ह्युंदाई भारतासाठी आपली पहिली एमपीव्ही विकसित करत असून, तिचे कोडनेम Ki1i आहे. ही कार मारुती अर्टिगापेक्षा वरच्या स्तरावर आणि टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या सेगमेंटमध्ये येऊ शकते. यात 1.5-लिटर डिझेल इंजिन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ADAS मिळण्याची शक्यता आहे.
Hyundai Developing Its First MPV For India
Hyundai Developing Its First MPV For India (फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 
  • ह्युंदाई भारतासाठी पहिली एमपीव्ही विकसित करत असून Ki1i कोडनेम आहे.

  • या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • इनोव्हा क्रिस्टा बंद झाल्यास ह्युंदाईला डिझेल एमपीव्ही सेगमेंटमध्ये संधी मिळू शकते.

भारतीय कार मार्केटमध्ये एसयूव्हीनंतर आता एमपीव्ही सेगमेंटमध्येही ह्युंदाई आपली पकड निर्माण करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतासाठी पहिली मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) विकसित करत असून, या कारचे कोडनेम ‘Ki1i’ असे आहे. ही नवीन कार टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला टक्कर देईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Hyundai Developing Its First MPV For India
Hyundai Sales October 2026: क्रेटा, व्हेन्यू आणि एक्स्टरची विक्री वाढली; कोणत्या कारला बसला फटका?

अर्टिगापेक्षा मोठी आणि इनोव्हा हायक्रॉसच्या सेगमेंटमध्ये

ह्युंदाईची ही नवीन एमपीव्ही सी-सेगमेंटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी अर्टिगाच्या वरच्या स्तरावर तिचे स्थान असेल. त्यामुळे टोयोटा इनोव्हा हायक्रॉसशी तिची थेट स्पर्धा होऊ शकते. या कारसाठी सध्याच्या जनरेशनच्या सांता फेची N3 प्लॅटफॉर्म आर्किटेक्चर वापरली जाण्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कारची लांबी आणि केबिनमधील जागा वाढवण्यास मदत होऊ शकते.

फीचर्सच्या बाबतीत या एमपीव्हीमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, ड्युअल स्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स आणि लेव्हल 2 ADAS यांसारखी फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. पण कंपनीने या फीचर्सबाबत कोणतीही ऑफीशियल माहिती दिलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष लाँचच्या वेळी यात कोणते फीचर्स असतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता

या कारच्या इंजिनबाबतही सध्या ठोस माहिती समोर आलेली नाही. पण ह्युंदाई यात डिझेल इंजिन देण्याचा विचार करू शकते. यासाठी कंपनीचे 1.5-लिटर, 4-सिलिंडर डिझेल इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन सध्या ह्युंदाई व्हेन्यू, क्रेटा आणि अल्काझारमध्ये वापरले जाते. या इंजिनची कॅपसिटी 117hp आहे.

Hyundai Developing Its First MPV For India
New Hyundai Elantra 2027 Revealed: नवीन ह्युंदाई एलांट्रा मध्ये 157 PS Hybrid इंजिन, मोठी केबिन आणि नवीन टेक्नोलॉजीसह हायटेक फीचर्

इनोव्हा क्रिस्टा बंद झाल्यास ह्युंदाईला संधी

टोयोटा इनोव्हा क्रिस्टा 2027 मध्ये बंद होण्याची शक्यता आहे. आगामी CAFE 3 उत्सर्जन नियमांमुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो. इनोव्हा क्रिस्टा अनेक वर्षांपासून डिझेल एमपीव्ही म्हणून कस्टमरची पसंती मिळवत आहे. दुसरीकडे, इनोव्हा हायक्रॉसमध्ये पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनचे ऑप्शन आहेत; डिझेल इंजिन नाही.

सध्या किया कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिस या कारमध्येही डिझेल इंजिनचा ऑप्शन आहे. अशा परिस्थितीत डिझेल इंजिनसह येणारी ह्युंदाईची एमपीव्ही या सेगमेंटमध्ये नवी स्पर्धा निर्माण करू शकते. ह्युंदाईने 2025 मध्ये भारतात एमपीव्ही आणण्याची योजना जाहीर केली होती. 2030 पर्यंत 26 नवीन मॉडेल्स सादर करण्याच्या कंपनीच्या योजनेचाही हा भाग आहे.