(फोटो सौजन्य-AI एआय)
जावा मोटरसायकलने बंगळुरू येथे आयोजित ‘ग्लोबल चेस लीग २०२६’ दरम्यान आपली नवीन स्पेशल एडिशन ‘ऑल स्टार्स ४२ बॉबर’ ऑफीशली लाँच केली आहे. महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या हस्ते या बाईकचे अनावरण करण्यात आले. ही बाईक ब्रँडच्या ‘ऑल स्टार्स’ चॅप्टरअंतर्गत येणारी दुसरी मोटरसायकल ठरली आहे. दिल्लीमध्ये या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत २,०८,९४२ रुपये ठेवण्यात आली असून, ती भारतातील सर्व जावा येझदी डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
स्ट्रक्चर आणि डिझाइनमधील बदल
नवीन ऑल स्टार्स ४२ बॉबरचा मूळ ‘फॅक्टरी-कस्टम’ लुक कायम ठेवण्यात आला आहे, परंतु बुद्धीबळाच्या थीमवर आधारित काही खास स्टायलिंग फीचर्स जोडण्यात आले आहेत. यामध्ये फ्लोटिंग सिंगल-सीट लेआउट, कॅन्टिलीव्हर रिअर सेक्शन आणि लो-स्लंग फिनिश पाहायला मिळते. या स्पेशल एडिशनमध्ये ‘चेकर्ड’ (चेस-बोर्ड सारखी) ग्राफिक्स, विशेष ‘ऑल स्टार्स’ लोगो आणि बुद्धीबळ व बायकिंगच्या थीमवर आधारित नवीन ‘सिल्व्हर नाइट’ रंग सादर करण्यात आला आहे.
याशिवाय ही कार ब्लॅक मिरर, शॅडो ब्लॅक, जॅस्पर रेड आणि मिस्टिक कॉपर अशा इतर आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यापैकी शॅडो ब्लॅक व्हेरियंटला मॅट-ब्लॅक फिनिश देण्यात आले आहे. ४२ बॉबरने तिच्या उत्कृष्ट डिझाइन आणि रोड प्रेझेंससाठी २०२६ मध्ये ‘स्टाईल आयकॉन ऑफ द इयर’चा पुरस्कारही पटकावला आहे.
व्हेरियंटनुसार एक्स-शोरूम किमती (नवी दिल्ली):
या बाईकच्या मेकॅनिकल भागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात तोच ३३४ सीसी चा सिंगल-सिलेंडर, फोर-स्ट्रोक, लिक्विड-कूल्ड DOHC पेट्रोल इंजिन देण्यात आला आहे. हे इंजिन ७,५०० आरपीएमवर २९.९ पीएस ची कमाल पॉवर आणि ५,५०० आरपीएमवर ३०.०१ एनएम चा पीक टॉर्क जनरेट करते. यात इलेक्ट्रॉनिक फ्युएल इंजेक्शन सिस्टीम आणि ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या बाईकचे वजन १७७ किलो असून, यात १२.५ लिटरची इंधन टाकी आणि ड्युअल एक्झॉस्ट (दोन सायलेंसर) मिळतात.
सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टीम
विशेष ऑनरशिप प्रोग्राम
कंपनी या ऑल स्टार्स ४२ बॉबरसोबत ‘ओनरशिप अॅश्युरन्स प्रोग्राम’ देत आहे. याअंतर्गत ४ वर्षे किंवा ५०,००० किमीची स्टँडर्ड वॉरंटी, ६ वर्षांपर्यंत एक्सटेंडेड वॉरंटीचा पर्याय, ८ वर्षांपर्यंत रोडसाइड असिस्टन्स आणि ५ वर्षांपर्यंत AMC कव्हरेज दिले जात आहे. सध्या भारतात जावा येझदीचे ४५० हून अधिक सेल्स आणि सर्व्हिस नेटवर्क उपलब्ध आहेत.






