या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरची मार्केटमध्ये दमदार विक्री, TVS आणि Bajaj झाले थक्क

ओला इलेक्ट्रिक नंतर, TVS दुसऱ्या क्रमांकावर आली जी बाजारात आपली iQube इलेक्ट्रिक स्कूटर विकत आहे. TVS ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या 11,737 युनिट्सची विक्री केली आहे.
scooter
Published on: 
Updated on: 

गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री चांगलीच झाली होती. नवीन ई-वाहन धोरणाच्या अंमलबजावणीनंतर, इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी कमी करण्यात आली आहे, तरीही इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये लोकांचा उत्साह कायम करतानादिसत आहे. Ola Electric, TVS, Bajaj, Ather आणि Hero MotoCorp हे मे 2024 मध्ये देशात सर्वाधिक विकले जाणारे ब्रँड होते. ओला इलेक्ट्रिकने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटरच्या 37,191 युनिट्सची विक्री केली आहे. तसेच मार्च 2024 मध्ये कंपनीने सर्वाधिक 53,000 युनिट्सची विक्री नोंदवली होती.

इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री

ओला इलेक्ट्रिक स्कूटरनंतर मार्केटमध्ये दुसऱ्या नंबरवर TVS ची iQube इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणावर आहे. TVS ने गेल्या महिन्यात 11,737 यूनिट्स इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली आहे. या इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये कंपनीचा वाटा 18.42% आहे तर ओला इलेक्ट्रिकचा वाटा 49% आहे. बजाज बद्दल बोलायचे झाले तर कंपनी चेतक चे इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल घेऊन बाजारात आहे.

कोणत्या कंपनीने केला विस्तार

बजाज चेतकने गेल्या महिन्यात 9,189 यूनिट्स इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली असून, यासह कंपनीने 14.42% मार्केट शेअरचा दावा केला आहे. बजाज ऑटो चेतकचे दोन प्रकार - अर्बन आणि प्रीमियम विकत आहे, ज्यांना बाजारात प्रचंड मागणी आहे. कंपनीने चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या डीलरशिपचा भारतातील 164 शहरांमध्ये विस्तार केला आहे.

स्कूटरची जास्त विक्री मे महिन्यात

मे महिन्यात सगळ्यात जास्त स्कूटर विक्री करणारी चौथी कंपनी एथर एनर्जी आहे. या कंपनीने 6,024 युनिट्सची विक्री नोंदवली असून, यासह, Ather चा बाजार हिस्सा 9.45% वर पोहोचली आहे. हिरो मोटोकॉर्प आपल्या विडा इलेक्ट्रिक स्कूटरच्या 2,453 युनिट्सच्या विक्रीसह पाचव्या स्थानावर राहिली आहे. मे 2024 मध्ये भारतात एकूण 75,500 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली. यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक मोटरसायकलचासुद्धा समावेश आहे.