कंपनीने काही दिवसांपूर्वी ही एसयूव्ही सादर केली होती आणि आज तिच्या किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत 10.99 लाख (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.फोक्सवॅगनने नवीन तायहून एका विशेष ऑफरसह सादर केली आहे, जी तिला केवळ एक कार न ठेवता एक स्मार्ट डील बनवते. 10.99 लाख पासून सुरू होणाऱ्या या एसयूव्हीमध्ये नवीन फीचर्स आणि प्रीमियम लूक असून, 75 टक्के बायबॅक गॅरंटी तिला इतर गाड्यांपेक्षा वेगळे ठरवते.
बायबॅक ऑफर काय आहे?
फोक्सवॅगन आपल्या ‘अश्युअर्ड बायबॅक’ कार्यक्रमांतर्गत, या एसयूव्हीच्या खरेदीवर 3 वर्षांपर्यंत किंवा30 हजार किलोमीटरपर्यंत, गाडीच्या एक्स-शोरूम किमतीच्या 75 टक्के पर्यंत परताव्याची हमी देत आहे.याचा अर्थ असा की, वापरकर्ते तीन वर्षांनंतर किंवा 30 हजार किमी चालवल्यानंतरही गाडी परत करू शकतात. त्यांना व्हेरिएंटनुसार, एक्स-शोरूम किमतीच्या 75 टक्के रक्कम परत मिळेल. ही ऑफर सध्या 31 मे पर्यंत केलेल्या बुकिंगसाठी वैध आहे. भारतीय प्रवासी कार बाजारात आतापर्यंत नोंदवलेले हे सर्वाधिक बायबॅक मूल्य असल्याचे म्हटले जाते.
नवीन टायगुन कशी आहे?
कंपनीने तिच्या लूक आणि डिझाइनमध्ये फारसे बदल केलेले नाहीत, पण जे काही बदल केले आहेत त्यामुळे गाडी अधिक प्रीमियम दिसते. पुढच्या भागात आता अधिक बारीक ग्रिल आणि पूर्ण रुंदीचा लाइट बार देण्यात आला आहे.आजकाल प्रचलित असलेला प्रकाशमान फोक्सवॅगन लोगो देखील यात समाविष्ट आहे. बंपरला पियानो ब्लॅक रंगाची फिनिशिंग दिली आहे आणि बाजूच्या प्रोफाइलमध्ये नवीन अलॉय व्हील्स दिसतात.
मागील बाजूस, एसयूव्हीला सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटरसह नवीन एलईडी टेललॅम्प मिळतात. तसेच, यात किंचित अपडेटेड बंपर आणि लाइट्ससाठी वेलकम व गुडबाय ॲनिमेशन्सही मिळतात.ही एसयूव्ही एकूण ९ रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये अॅव्होकॅडो पर्ल, स्टील ग्रे, कँडी व्हाइट, डीप ब्लॅक, वाइल्ड चेरी रेड, लावा ब्लू, रिफ्लेक्स सिल्व्हर, कार्बन स्टील आणि कार्बन स्टील मॅट यांचा समावेश आहे.
नवीन Volkswagen Taigun: इंजिन आणि परफॉर्मन्स
नवीन Taigun मध्ये 1.0 लिटर TSI टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 114 bhp पॉवर आणि 178 Nm टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, 1.5 लिटर TSI इंजिन 148 bhp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करते.
ट्रान्समिशन (Transmission):
1.0 लिटर इंजिन: 6-स्पीड मॅन्युअल आणि नवीन 8 -स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स.
1.5 लिटर इंजिन: 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक (DSG).
या SUV मधील सर्वात मोठा मेकॅनिकल बदल म्हणजे यात आता 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
केबिन आणि फीचर्स
कारच्या आत तुम्हाला परिचयाचा ‘लेआउट’ पाहायला मिळेल, परंतु त्यात अनेक नवीन फीचर्स जोडले गेले आहेत:
प्रीमियम लूक: नवीन कलर ऑप्शन्स आणि टू-टोन फिनिशमुळे केबिन अधिक प्रीमियम दिसते. व्हेरिएंटनुसार यात ६ प्रकारचे अपहोल्स्ट्री ऑप्शन्स मिळतात.
डिस्प्ले: यात 10.25 -इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि 10.1इंच अपडेटेड इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.
स्मार्ट तंत्रज्ञान: ही सिस्टम आता अधिक स्मूद सॉफ्टवेअर, नवीन ग्राफिक्स आणि AI बेस्ड फीचर्ससह येते, ज्यामुळे रिअल-टाइम माहिती आणि उत्तम व्हॉइस कंट्रोल मिळतो.
इतर सोयी: Taigun फेसलिफ्टमध्ये आता 40 हून अधिक फीचर्स आहेत. यात फुल LED हेडलॅम्प्स (ऑटोमॅटिक लेव्हलिंगसह), पॅनोरामिक सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 6-वे इलेक्ट्रिक ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स देण्यात आल्या आहेत. एसी (AC) सिस्टममध्येही सुधारणा केल्यामुळे कूलिंग आता अधिक प्रभावी झाले आहे.
सेफ्टी फीचर्स (सुरक्षा)
सुरक्षेच्या बाबतीत ही SUV अत्यंत मजबूत आहे. फॉक्सवॅगनच्या दाव्यानुसार, यात 40 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स आहेत:
एअरबॅग्ज
ABS (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) सह EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन)
ESC (इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल) आणि ट्रॅक्शन कंट्रोल
हिल होल्ड असिस्ट आणि ISOFIX माऊंट्स
ऑटो डिमिंग IRVM
कंपनीच्या मते, हे नवीन मॉडेल देखील मागील व्हर्जनप्रमाणेच 5-स्टार सेफ्टी रेटिंगसह येते.






