(फोटो सौजन्य-AI एआय)
यामाहाने याआधी R3 आणि MT-03 भारतात CBU मार्गाने विकल्या होत्या. पण जास्त किंमतीमुळे या बाइक्सचे सेल्स अपेक्षेप्रमाणे झाले नाहीत आणि त्यानंतर त्यांची विक्री बंद करण्यात आली. R3 ची किंमत ₹4.65 लाख, तर MT-03 ची किंमत ₹4.60 लाख एक्स-शोरूम होती. आता कंपनीने भारतात उत्पादन किंवा लोकलायझेशन वाढवले, तर या बाइक्स जास्त स्पर्धात्मक किंमतीत आणण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
Yamaha Tenere 900 ग्लोबल डेब्यू नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता! जाणून घ्या कधी येणार भारतात?
R3 मध्ये 321 cc पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे इंजिन 42 PS पॉवर आणि सुमारे 29.5 Nm टॉर्क जनरेट करते. 6-स्पीड गिअरबॉक्स, 37 mm USD फोर्क आणि ड्युअल-चॅनल ABS यामुळे ही बाइक स्पोर्टी राइडिंगसाठी तयार करण्यात आली आहे. MT-03 मध्येही याच प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो.
यामाहाने भारतात Lander 250 देखील सादर केली होती. ही बाइक ड्युअल-स्पोर्ट सेगमेंटमध्ये कंपनीची एंट्री मजबूत करू शकते. सध्या या सेगमेंटमध्ये Hero Xpulse 200 4V, Xpulse 210 आणि Kawasaki KLX230 सारख्या बाइक्स आहेत. त्यामुळे Lander 250 ला वेगळे स्थान मिळण्याची शक्यता आहे.
Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी
प्रीमियम सेगमेंटमध्ये R7 आणि Tenere 700 हे आणखी 2 महत्त्वाचे ऑप्शन ठरू शकतात. R7 मध्ये 689 cc CP2 पॅरलल-ट्विन इंजिन असून ते 72.4 bhp पॉवर आणि 67 Nm टॉर्क देते. दुसरीकडे Tenere 700 यामाहाला मिडलवेट अॅडव्हेंचर सेगमेंटमध्ये मजबूत पर्याय देऊ शकते.
यामाहाच्या भारतातील R&D कॅपॅसिटी वाढवण्याच्या आणि इंडोनेशियाच्या तुलनेत एक्सपोर्ट कॅपॅसिटी वाढवण्याच्या योजनाही महत्त्वाच्या ठरतात. जर मोठ्या क्षमतेच्या बाइक्सचे उत्पादन भारतात झाले, तर CBU मॉडेल्सच्या तुलनेत किंमत कमी होण्याची शक्यता आहे. मात्र R3, MT-03, R7, Lander 250 किंवा Tenere 700 यांच्या भारतातील लाँचबाबत यामाहाने अद्याप ऑफीशली टाइमलाइन जाहीर केलेली नाही.






