(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांसाठी ८ वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आयोगाच्या बैठकी सुरु आहे. येती बैठक चेन्नाईमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर देशातल्या इतर शहरांमध्येही टप्प्याटप्प्याने बैठका घेतल्या जाणार आहेत. या सगळ्या बैठका पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेच्या पुर्ततेनंतर अंतिम अहवाल कंद्राकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर कंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ८ वा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
एका अंदाजिक गणनेनुसार, जर अंमलबजावणीला 20 महिन्यांचा उशीर झाला तर लेव्हल ७ च्या कर्मचाऱ्यांना मोठी एरियर रक्कम मिळू शकते. ७ व्या वेतन आयोगानुसार ४४९०० बेसिक पे असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 2.57 फिटमेंट फॅक्टर गृहीत धरल्याने ८ व्या वेतन आयोगातील अंदाजित बेसिक पे ही 1,15393 होऊ शकतो. म्हणजे इतका लाभ मिळू शकतो. या कॅलक्युलेशनमध्ये महिन्याचा फरक हा सुमारे 70,493 होतो. 20 महिन्यांसाठी हा फरक कॅलक्युलेशन केल्यास 70,493*20=14,09,860 म्हणजेच 14,09,860 इतका एरियर मिळण्याची शक्यता आहे.
याच्या अंदाजित गणनेनुसार, 20 महिन्याच्या काळाचा विचार केला तर लेव्हल ६ च्या कर्मचाऱ्यांना सुमारे ११.११ लाख तर लेव्हल ५ च्या कर्मचाऱ्यांना ९.१३ लाख इतकं तर लेव्हल ४ च्या कर्मचाऱ्यांना ८ लाखपर्यंत एरियर मिळण्याची शक्यता आहे. मात्र हे आकडे सध्या अंदाजावरील कॅलक्युलेशनवर आधारीत आहेत.






