Bank Of India च्या भागधारकांची चांदी! ( सौजन्य - सोशल मीडिया )
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा ऑपरेटिंग प्रॉफिट ३३.१९ ट्क्क्यांनी वाढून ५,०८९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तर पहिल्या सहामाहीत तो ३० टक्क्यांनी वाढून १०,१४० कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत निव्वळ व्याज उत्पन्न १८.५२ टक्क्याने वाढून ७,००७ कोटी रुपये झाले आहे. तसेच बिगर-व्याज उत्पन्न २४.७८ टक्क्याने वाढून २,७७० कोटी रुपये झाला आहे. बँकेचे जागतिक निव्वळ व्याज मार्जिन सहा बेसिस पॉईंट्सने सुधारून २.४७ टक्के झाले आहे आणि खर्च-ते-उत्पन्न गुणोत्तर ५०७ बेसिस पॉईंट्सने सुधारून ४७.९५ टक्के झाले आहे.
बँकेचा जागतिक व्यवसाय मागील वर्षाच्या तुलनेत २१.१३ टक्क्याने वाढून १८.९२ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. जागतिक ठेवी २१.५९ टक्क्याने वाढून १०.३७ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्या आहेत, तर जागतिक कर्जे २०.५८ टक्क्याने वाढून ८.५५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहेत. विदेशी कर्जे ३५.२१ टक्क्याने वाढून १.५१ लाख कोटी रुपये झाली आहेत. याशिवाय, किरकोळ कर्जे १९.२७ टक्क्याने, एमएसएमई कर्जे २०.२७ टक्क्याने आणि शेतीविषयक कर्जे १६.३४ टक्क्याने वाढली आहेत. देशांतर्गत एकूण कर्जांमध्ये ‘राम’ (RAM – रिटेल, शेती आणि एमएसएमई) कर्जाचा वाटा ५८.६३ टक्के इतका आहे. सप्टेंबर २०२६ पर्यंत देशांतर्गत कासा ठेवी (Domestic CASA Deposits) ७.१७ टक्क्याने वाढून ३.०७ लाख कोटी रुपयांवर झेपावल्या आहेत.
बँकेचे स्थूल अनुत्पादक मालमत्ता गुणोत्तर (Gross NPA Ratio) मागील वर्षाच्या तुलनेत ९४ बेसिस पॉईंट्सने सुधारून १.६० टक्के झाले आहे. निव्वळ अनुत्पादक मालमत्ता प्रमाण (Net NPA Ratio) २३ बेसिस पॉईंट्सने सुधारून ०.४२ टक्के झाले आहे. तरतूद कव्हरेज गुणोत्तर ९४.४५ टक्के राहिले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत स्लिपेज गुणोत्तर (Slippage Ratio) ०.१५ टक्के आणि कर्ज खर्च ०.१२ टक्के होता.
बँकेचे भांडवल पर्याप्तता गुणोत्तर (सीआरएआर) ३० सप्टेंबर २०२६ रोजी १७.७८ टक्के होते आणि ते मागील वर्षाच्या तुलनेत १०९ बेसिस पॉईंट्सने जास्त आहे; यात बँकेचे उच्च दर्जाचे मूळ भागभांडवल (सीईटी-वन) १५.४९ टक्के आहे.
डिजिटल पातळीवर ‘ऑम्नी निओ’ मोबाईल बँकिंगच्या वापरकर्त्यांची संख्या १.४९ कोटींहून अधिक झाली आहे आणि इंटरनेट बँकिंगचे वापरकर्ते १.११ कोटींहून अधिक झाले आहेत. डिजिटल व्यवहारांमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होऊन ते २.२१ अब्ज झाले आहेत. तसेच, बँकेने पहिल्या सहामाहीत ७.०७ लाख नवीन पंतप्रधान जन धन योजना (PMJDY) खाती उघडली आहेत.
Ans: दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २५.३४ टक्क्यांनी वाढून ₹३,२०२ कोटी रुपये झाला आहे, तर पहिल्या सहामाहीचा एकूण नफा ३० टक्क्यांनी वाढून ₹६,२७० कोटींवर पोहोचला आहे.
Ans: बँकेचे स्थूल अनुत्पादक मालमत्ता प्रमाण म्हणजेच Gross NPA ९४ बेसिस पॉईंट्सने सुधारून थेट १.६० टक्के झाला आहे. तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता प्रमाण म्हणजेच Net NPA ०.४२ टक्के झाले आहे.
Ans: बँकेचा जागतिक व्यवसाय २१.१३ टक्क्यांनी वाढून ₹१८.९२ लाख कोटींच्या पुढे गेला आहे, ज्यामध्ये किरकोळ, कृषी आणि MSME कर्जांचा देशांतर्गत एकूण कर्जांमध्ये ५८.६३ टक्के वाटा आहे.






