सुरक्षित शाळा नवी संकल्पना; आगामी वर्षात ५० काेटी रुपयांची तरतूद

शाळांच्या भागात वाहनांची कमीत कमी ये जा असेल आणि वर्दळ असलेल्या पदपथावरून शाळेत प्रवेश करता येईल, अशा प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सुरक्षित वातावरण देणे हा या मागचा उद्देश आहे. हा प्रयाेग यशस्वी झाला आणि त्याला शाळा समुहाने सकारात्मकतेने स्वीकारल्यास चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पाचा पुढे विस्तार केला जाईल.
school
प्रतिकात्मक फोटो
Published on: 
Updated on: 

मुंबई : रस्ते आणि वाहतूक खाते तसेच वाहतूक पाेलिस यांच्या सहकार्याने सुरक्षित शाळा ही नवी संकल्पना तयार केली असून ती प्रायाेगिक तत्वावर राबविली जाणार आहे. त्यासाठी आगामी वर्षात ५० काेटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

शाळांच्या भागात वाहनांची कमीत कमी ये जा असेल आणि वर्दळ असलेल्या पदपथावरून शाळेत प्रवेश करता येईल, अशा प्रकारे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सुरक्षित वातावरण देणे हा या मागचा उद्देश आहे. हा प्रयाेग यशस्वी झाला आणि त्याला शाळा समुहाने सकारात्मकतेने स्वीकारल्यास चालू आर्थिक वर्षात या प्रकल्पाचा पुढे विस्तार केला जाईल. तसेच शाळेच्या ५०० मीटर पर्यंतचा परिघ हा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी शाळेत प्रवेश करण्यासाठी सुरक्षित असेल यासाठी प्रयत्न केले जातील, अशी या मागची कल्पना असल्याचे अर्थसंकल्पात स्पष्ट केले आहे. त्यासाठी ५०० काेटी रुपयांची तरतूद केली आहे.