आत्ताचे सेनेचे दोन गट असले तरी 'त्यावेळी एकच शिवसेना होती. यांनी फक्त पालिका वाटून घेतल्या होत्या. हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत कारण या सर्व पालिकांमध्ये यांचीच सत्ता किंवा प्रशासक होते. मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळ्याची चौकशी झालीच पाहिजे.
अवघ्या दोन तासाच्या जोरदार पावसामुळे कल्याणच्या विविध भागात पावसाचे पाणी साचण्यास सुरुवात झाली. विशेषत: कल्याण पूर्व भागातील आडिवली ढोकळी परिसरात असलेल्या चाळींच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना पावसाच्या पाण्याचा सामना करावा लागला. आडिवली ढोकळी परिसर जलमय झाला होता.
समस्या सुटणार की, केवळ आश्वासन ठरणार हे लवकर स्पष्ट होणार आहे. कारण अनेक वर्षापासून नागरिक नरक यातना भोगत आहेत. चाळ माफिया आणि महापालिका अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने या चाळी उभ्या राहतात. त्याठिकाणी सुविधा पुरविल्याच जात नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
चाणक्य 2500 वर्ष पूर्वी सांगून गेले. चोर, दरोडेखोर, लुटारू, बलात्कारी आले की समजायचं राजा योग्य दिशेने चालला आहे, त्यावेळी राजा चाणक्य होते आता प्रधानमंत्री आहे, हे सगळे एकत्र आलेत याचा अर्थ असा आहे की, देशाचे प्रधानमंत्री योग्य दिशेने जातायत.