बेरोजगारी आणि महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांच्या पदरी निराशा, अर्थसंकल्पावरून ममतांनी साधला निशाणा

ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये (Mamata Banerjee Tweet) म्हटले आहे की, अर्थसंकल्पामुळे (Budget 2022) बेरोजगारी आणि महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे.
mamata banerjee
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee Reaction On Union Budget 2022) यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाला ‘पेगॅसस स्पिन बजेट’ अशी उपमा दिली आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्यांसाठी कोणतीही तरतूद नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अर्थसंकल्पामुळे बेरोजगारी आणि महागाईने पिचलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पदरी निराशाच आली आहे. मोठ्या बाता मारायच्या मात्र प्रत्यक्षात काहीही द्यायचं नाही. हे पेगॅसस स्पिन बजेट आहे. तृणमूल काँग्रेसचे वरिष्ठ नेता डेरेक ओब्रायनने दावा केला आहे की अर्थसंकल्पातून हे स्पष्ट होत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी, गरीब आणि मध्यम वर्गाची चिंता करत नाहीत.