एलआयसीच्या आयपीओचे काम जोरात सुरू, या वर्षी खाजगीकरण वाढेल: निर्मला सीतारामन

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी संजीवनी ठरू शकतो. आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यावर्षी सरकारचे उद्दिष्ट भांडवली खर्च वाढवण्याचे असेल. यासोबतच खासगीकरणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.
nirmala sitharaman
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपल्या भाषणात सीतारामन म्हणाल्या की, सर्वांगीण कल्याण हे आमचे प्राधान्य आहे. या अर्थसंकल्पात खासगी गुंतवणूक वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एलआयसीच्या आयपीओचे काम जोरात सुरू आहे. यंदा खासगीकरणात आणखी वाढ होणार आहे. वाढत्या भांडवली खर्चामुळे देशाच्या आर्थिकसुधारनेला चालना मिळेल. या वर्षाच्या सुरुवातीला सरकारने एअर इंडियाची निर्गुंतवणूक पूर्ण केली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी हा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी संजीवनी ठरू शकतो. आपल्या भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यावर्षी सरकारचे उद्दिष्ट भांडवली खर्च वाढवण्याचे असेल. यासोबतच खासगीकरणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, यापूर्वी सरकारने टाटा समूहासोबत एअर इंडियाचा करार केला होता. याशिवाय सरकार खासगीकरणाकडे अधिक लक्ष देत आहे.