दिल्लीत CJP Protests चा मोठा फटका! ( सौजन्य - सोशल मीडिया )
कडक पोलीस बंदोबस्त आणि आंदोलनांमुळे राजधानीतील इतर बाजारपेठांनाही त्याचा फटका बसला. आंदोलनासाठी असलेल्या तरतूदीमुळे दररोज खरेदीसाठी दिल्लीबाहेरून येणारे तीन ते चार लाख लोक आज येऊ शकले नाहीत. सुरक्षेची भीती आणि वाहतूक कोंडीमुळे दिल्लीतील रहिवाशांनीही आज खरेदी करणे टाळलं. बहुतेक प्रमुख मेट्रो स्थानके बंद असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला आहे. पेट्रोल पंपांवरदेखीळ शुकशुकाट पाहायला मिळाला. हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृह, ब्युटी पार्लर आणि सलूनमधील बुकिंग रद्द करण्यात आले आहे.
दरम्यान, खान मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजीव मेहरा यांनी सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाचा संदर्भ देत, आपण स्वतःच बाजार बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, जेव्हा आंदोलकांना थांबवले जातं, तेव्हा त्याचा पहिला थेट प्रभाव खान मार्केटवर पडतो. यामुळे दुकाने आणि मालमत्तेचे नुकसान होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
मेहरा म्हणाले की खान मार्केट, कॅनॉट प्लेस आणि साउथ एक्स्टेंशन सारख्या बाजारपेठांमध्ये दुकाने बंद असतानाही भाडे आणि पगार यासारखे मोठे खर्च सुरूच असतात. एका दिवसाच्या बंदमुळे प्रति दुकान एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. फळे आणि किराणा यांसारख्या नाशवंत वस्तूंमुळे नुकसान आणखी वाढते. त्यांनी राजकीय पक्षांना त्यांच्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले जात आहे आणि व्यस्त व्यावसायिक भागांपासून दूर शांततापूर्ण निदर्शने करावीत अशी विनंती केली जात आहे.






