Ambani House Antilia: अंबानींच्या अँटिलियालाही टक्कर!(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
रिपोर्ट्सनुसार गौतम सिंघानिया यांच्या JK House ची किंमत तब्बल ६००० कोटी रुपये आहे. दरम्यान अँटिलियाची किंमत जवळपास ५००० कोटी सांगितली जाते. तुलना केली असता JK House अँटिलियापेक्षा १००० कोटी रुपयांनी महाग आहे. त्यामुळेच या घराची चर्चा सर्वत्र होते.
फक्त किंमतच नाही तर या घराची बनावट पण एकदम वेगळी आहे. ही इमारत जवळपास १४५ मीटर उंच तसेच ३० मजले आहेत. आतमध्ये सगळ्या लक्झरी सुविधा आहेत.याची सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या इमारतीच्या वरच्या मजल्यांवर बाग तयार केली आहे. एवढ्या उंचीवर राहून पण तुम्हाला जमिनीवर असल्यासारखं वाटावं म्हणून झाडं, हिरवळ दिसावी यासाठी हा प्रयत्न केला आहे. मुंबईसारख्या शहरात जिथे जागेला सोनं म्हणतात तिथे घरातच बाग असणं म्हणजे नक्कीच वेगळे रुप दर्शवले आहे. त्यामुळेच JK House ला मुंबईतल्या सगळ्यात खास घरांपैकी एक मानलं जातं.
गौतम सिंघानिया यांना फक्त मोठं घरच नाही तर भारी गाड्यांची पण खूप आवड आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा एक महागड्या गाड्या त्यांच्या गॅरेजमध्ये आहे. सांगायचे झाले तर, Lamborghini Gallardo LP570 Superleggera, Lotus Elise Convertible, Nissan Skyline GT-R, Ferrari 458 Italia आणि Audi Q7 सारख्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. या सगळ्या गाड्या कोट्यवधीच्या आहेत. घर आणि गाड्या दोन्हीवरून त्यांची लक्झरी लाइफस्टाइल कशी आहे हे दिसून येतं.
PayPal Layoffs in India: PayPalचा भारताला मोठा धक्का! तब्बल 25% कर्मचाऱ्यांवर नोकरीवर टांगती तलवार
अल्टामाउंट रोड हा मुंबईतला सगळ्यात महागडा एरिया आहे. इथे सगळे अब्जाधीश लोक राहतात. अंबानींचं अँटिलिया पण याच रोडवर आहे. त्यामुळे JK House चं लोकेशन पण एकदम प्राइम आहे. उंची, लक्झरी, प्रायव्हसी आणि लोकेशन या सगळ्यामुळे या घराची किंमत ६००० कोटी इतकी आहे, हे आकडे रिपोर्ट्सनुसार आले असून या कंपनीने कोणतीही अधिकृत किंमत सांगितलेली नाही.
RBI Scheme: आरबीआयच्या ‘या’ योजनेमुळे रुपयाची तुफानी उसळी! डॉलरच्या तुलने 47 पैशाची रिकव्हरी






