Stock Market Holiday: उद्या Share Market बंद राहणार! सोमवारी सेन्सेक्स 1400 अंकांनी कोसळला, जाणून घ्या उद्या काय चालू, काय बंद

गुरु नानक जयंतीनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी भारतीय शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे. त्यामुळे BSE आणि NSE वर इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज आणि इतर संबंधित सेगमेंटमध्ये व्यवहार होणार नाहीत.
Stock Market Holiday:  (सौजन्य- सोशलमीडिया)
Stock Market Holiday: (सौजन्य- सोशलमीडिया) Stock Market Holiday: (सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • २४ नोव्हेंबरला BSE आणि NSE बंद

  • कमोडिटी मार्केट संध्याकाळी ५ वाजता सुरू

  • २५ डिसेंबरला वर्षातील पुढील सुट्टी

आज सोमवारी शेअर बाजारात घसरण बघायला मिळते. तरी एकूण गेल्या काही दिवसांपासून बाजाराची तेजीची गाडी सुसाट असतानाच बाजाराला ब्रेक लागणार आहे! कारण मंगळवारी, 24 नोव्हेंबरला दलाल स्ट्रीटवर शुकशुकाट असेल. गुरु नानक जयंतीच्या सार्वजनिक सुट्टीमुळे BSE आणि NSE वर शेअर्सची खरेदी-विक्री होणार नाही. पण सगळंच ठप्प नाही. कमोडिटी आणि EGR सेगमेंटमध्ये संध्याकाळी ट्रेडिंगची संधी खुली राहील.

• गुरु नानक जयंतीमुळे बाजाराला सुट्टी

गुरु नानक जयंती 'प्रकाश गुरुपरब श्री गुरु नानक देव' किंवा 'प्रकाश पर्व' म्हणून पण ओळखली जाते. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू गुरु नानक देव यांचा हा जन्मदिवस आहे. NSE वर इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज, इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज, निगोशिएटेड ट्रेड रिपोर्टिंग प्लॅटफॉर्म, म्युच्युअल फंड्स, सिक्युरिटीज लेंडिंग अँड बॉरोइंग स्कीम, कॉर्पोरेट बॉण्ड्स आणि न्यू डेट सेगमेंटमध्ये व्यवहार होणार नाहीत.

कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज आणि EGR सेगमेंटमध्ये सकाळच्या सत्रात सुट्टी असेल, पण संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 11:30 किंवा 11:55 पर्यंत कामकाज चालू राहील.

• पुढची सुट्टी कधी?

शनिवार-रविवार हे साप्ताहिक बंदचे दिवस तर आहेत. त्याशिवाय काही सार्वजनिक सुट्ट्यांनाही बाजार बंद असतो. सुट्ट्यांची यादी BSE आणि NSE च्या वेबसाईटवर बघायला मिळते. 2026 मध्ये आता शनिवार-रविवार सोडून पुढची सुट्टी 25 डिसेंबरला, म्हणजेच शुक्रवारी नाताळनिमित्त असेल.

• सोमवारी बाजार गडगडला

निफ्टी आणि सेन्सेक्स सारख्या मोठ्या निर्देशांकांनी सुरुवातीला मोठी तेजी दाखवली होती, पण त्यानंतर खासगी आणि सरकारी क्षेत्रातल्या बँका तसेच धातू (मेटल) कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारातला उत्साह मावळला आणि निर्देशांकांनी आपली वाढ गमावली. मोठ्या बाजारात पण कमजोरी दिसून आली; निफ्टी मिडकॅप 150 आणि स्मॉलकॅप 250 हे निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते.सकाळी 10:41 वाजता, सेन्सेक्स आपल्या दिवसातल्या उच्चांकी पातळी असलेल्या 84,662 अंकांवरून 1,400 अंशांहून जास्त घसरून 83,210 या नीचांकी पातळीवर आला.

त्याच वेळी, 50 शेअर्सचा समावेश असलेला निफ्टी 0.7 टक्क्यांनी म्हणजेच 180 अंशांहून जास्त घसरून 25,600 च्या खाली आला. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील, HDFC बँक, अॅक्सिस बँक, ICICI बँक, SBI आणि अल्ट्राटेक सिमेंट सारख्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांपर्यंत घसरण झाली. दुसरीकडे, TCS, टेक महिंद्रा, इन्फोसिस, HCL टेक आणि मारुती सुझुकी हे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते.