दरमहा 7,500 गुंतवा आणि करोडपती होण्याच्या दिशेने (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपण नेहमी जी SIP करतो त्यात काय होतं, दर महिन्याला एकच रक्कम SIP ची फिक्स करतो. समजा ७५०० ची SIP लावली तर २० वर्ष फक्त ७५०० भरत असतो. पण स्टेप-अप SIP मध्ये तुम्ही दरवर्षी तुमची SIP वाढवू शकते. उदाहरणार्थ यावर्षी ७५००, पुढच्या वर्षी १०% वाढवून ८२५०, त्याच्या पुढच्या वर्षी ९०७५ अशी ठेवली तर, तुमचा जास्त पैसा मार्केटमध्ये जातो आणि त्यावर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाउंडिंगचा जास्त फायदा मिळतो.
तुम्ही आजपासून दर महिन्याला ७५०० रुपयांची SIP सुरू केली. त्यावर दरवर्षी १०% ने ती वाढवत गेलात. म्हणजेच तुम्हाला वर्षाला १२% परतावा मिळू शकतो. तर तुम्ही फक्त १८ वर्षात १ कोटीचे मालक व्हाल. तुमच्या जवळ १ कोटी १ लाख होईल. या १८ वर्षात तुम्ही स्वतःच्या खिशातून फक्त ४१ लाख रुपये गुंतवले असतील. त्यावर तुम्हाला जवळपास ६० लाखांचा नफा मिळेल.
Share Market Today: घसरणीला लागला ब्रेक, शेअर बाजारात तेजी; ४०० अंकांनी बँक निफ्टी उसळले
टीप – हे सगळं गणित १२% परताव्याच्या अंदाजावर आहे. मार्केट वर-खाली होतं त्यामुळे परतावा कमी जास्त होऊ शकतो. हा गुंतवणुकीचा सल्ला नाहीये, फक्त माहितीसाठी आहे. पैसे गुंतवण्याआधी एकदा चांगल्या आर्थिक सल्लागाराला नक्की विचारा.






