Share Market Today: आज होणार फायदाच फायदा! भारतीय शेअर बाजारात वाढीची शक्यता, 'या' स्टॉक्सवर ठेवा लक्ष
Todays Gold-Silver Price: अभूतपूर्व वाढ! चांदीचा दर आकाशाला भिडला, किंमती पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
गुरुवारी, भारतीय शेअर बाजाराने इंट्राडे ट्रेडमध्ये विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर निर्देशांक किंचित वाढून बंद केले, बेंचमार्क निफ्टी ५० २६,२०० च्या वर बंद झाला. सेन्सेक्स ११०.८७ अंकांनी म्हणजेच ०.१३% ने वाढून ८५,७२०.३८ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १०.२५ अंकांनी म्हणजेच ०.०४% ने वाढून २६,२१५.५५ वर बंद झाला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक २०९.२५ अंकांनी किंवा ०.३५% ने वाढून ५९,७३७.३० वर बंद झाला.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या वेल्थ मॅनेजमेंटमधील डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स हेड चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये संवर्धन मदरसन इंटरनॅशनल , लॉरस लॅब्स आणि कॉफोर्जचे शेअर्सचा समावेश आहे. प्रभुदास लिल्लाधर येथील टेक्निकल रिसर्चच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे ट्रेडिंग स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये बेलराईज इंडस्ट्रीज, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि जीएनए एक्सल्सचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केली आहे, ज्यामध्ये कॅरारो इंडिया, प्रिसिजन वायर्स इंडिया, बेलराईज इंडस्ट्रीज, युरेका फोर्ब्स आणि तत्व चिंतन फार्मा केम यांचा समावेश आहे.
काय सांगता काय? दिल्लीत टॉमेटोचा भाव 80 रूपये, मात्र सरकारचा जनता भाव ठरतोय वरचढ; केवळ 52 रुपयात…
सुमीत बगाडिया (चॉईस ब्रोकिंग), गणेश डोंगरे (आनंद राठी) आणि शिजू कूथुपलक्कल (प्रभूदास लिल्लाधर) या बाजार तज्ज्ञांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेड, श्रीराम फायनान्स लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, ओबेरॉय रिअॅल्टी लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), सेमिंडिया प्रोजेक्ट्स लिमिटेड, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड आणि कोरोमंडेल इंटरनॅशनल लिमिटेड या शेअर्सचा समावेश आहे.






