Stock Market Today: अमेरिका-इराण तणाव कमी होण्याचे संकेत; भारतीय शेअर बाजारात आज तेजीची शक्यता
मंगळवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असल्याने बीएसई आणि एनएसई व्यापारासाठी बंद होते. सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,९०० च्या पातळीखाली बंद झाला. सेन्सेक्स ७०२.६८ अंकांनी, म्हणजेच ०.९१ टक्क्यांनी घसरून ७६,८४७.५७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० २०७.९५ अंकांनी, म्हणजेच ०.८६ टक्क्यांनी घसरून २३,८४२.६५ वर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी 307.70 अंकांनी, म्हणजेच 0.55% ने घसरून 55,605.05 वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑक्टॅनॉम टेक आणि हेज्ड.इनचे संस्थापक आणि सीईओ, राहुल घोष यांनी दिर्घकाळ गुंतवणूक करण्यासाठी 10 शेअर्सची निवड केली आहे. राहुल घोष यांनी निवडलेल्या शेअर्समध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस, इटरनल, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो (L&T), हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL), आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी, भारती एअरटेल, टायटन कंपनी यांचा समावेश आहे. निओट्रेडर आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे सह-संस्थापक राजा व्यंकटरमण यांनी आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये निओट्रेडर आणि स्टॉक रिसर्च प्लॅटफॉर्म मार्केटस्मिथ इंडियाचे सह-संस्थापक राजा व्यंकटरमण यांनी इंडियन बँक , ईपीएल लिमिटेड, वेदांता लिमिटेड, वेल्सपन कॉर्प लिमिटेड आणि अदानी पॉवर लिमिटेड यांचा समावेश आहे.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार भारतीय आयुर्विमा महामंडळ, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, सरकारी गॅस कंपनी गेल (इंडिया) लिमिटेड, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसी, आनंद राठी शेअर, हिंदुस्तान झिंक, रेलटेल कॉर्प, भारतीय परदेशी बँक, मिंडा कॉर्पोरेशन, एचजी इन्फ्रा इंजिनिअरिंग या शेअर्सवर त्यांचे लक्ष केंद्रीत करू शकतात. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज बुधवारी भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी अक्युम्स ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स, एचबीएल इंजिनिअरिंग, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्ज, एमक्योर फार्मास्युटिकल्स आणि एनएलसी इंडिया या पाच शेअर्सची शिफारस केली आहे.






