Elon Musk Starlink vs Reliance Jio: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Elon Musk Starlink vs Reliance Jio: भारतात सॅटेलाईट इंटरनेटवरून मोठी चर्चा सुरू आहे. एलॉन मस्कची स्टारलिंक भारतात येणार म्हणून बातम्या येत आहेत. यावर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने आज एकदम स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. रिलायन्सने म्हटले आहे की, आम्हाला स्पर्धेची कसलीही भीती नाही. स्टारलिंक आली तरी स्वागतच आहे. Mukesh Ambani-Elon Musk:
रिलायन्सने शुक्रवारी X वर एक पत्रक टाकले. त्यात त्यांनी सांगितले की, भारतात धंदा करायचा असेल तर सगळ्यांना नियम पाळावेच लागतील. भारतीय कंपनी असो किंवा परदेशी कंपनी, सगळ्यांसाठी एकच कायदा आहे. हे सरकारने पण स्पष्ट केले आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिलायन्सने सांगितले की, आमची जिओची सॅटेलाईट सेवा पण अजून मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. आम्ही पण रांगेत उभे आहोत. स्टारलिंकला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा असे नाही होणार. रिलायन्स म्हणाले की देशात गुंतवणूक झाली पाहिजे, नवीन कंपन्या आल्या पाहिजेत, हे चांगलेच आहे. पण हे सगळे कायद्यानुसार झाले पाहिजे. कायदा सगळ्यांसाठी सारखा पाहिजे. प्रत्येक कंपनीने नियम पाळूनच ग्राहकांना सेवा द्यावी.
Statement from Reliance Industries In light of recent remarks about Reliance and the Indian market, we wish to place the facts on record. Like every Indian enterprise, Reliance has grown in an India that welcomes investment and innovation, homegrown or international, that improve the lives of the people. That openness rests on the rule of law. As the Government of India has stated, it applies the same process to every applicant, Indian or foreign. Jio’s own satellite services await clearances. At Reliance, we have never feared competition. We see it as the truest test of who serves the customer best. Jio itself entered India’s crowded telecom market in 2016 as the newest player, with not a single customer. In just ten years, Jio has earned the trust of over 530 million customers and given Indians some of the best digital infrastructure and most affordable data in the world. We welcome competition in satellite communications, including Starlink. Every player, Jio included, must serve the people of India and abide by the laws and policies of the land. — Reliance Industries Limited (@RIL_Updates) October 16, 2026
रिलायन्सने आपल्या जुन्या दिवसांची पण आठवण करून दिली. 2016 मध्ये जेव्हा जिओ आले तेव्हा आमच्याकडे एक पण ग्राहक नव्हता. लोक हसायचे. पण 10 वर्षात आज जिओचे 53 कोटीपेक्षा जास्त ग्राहक झाले आहेत. आम्ही देशात स्वस्त इंटरनेट आणले, टॉवर उभे केले. स्पर्धा कशी करायची हे आम्हाला माहिती आहे. शेवटी ग्राहक कोणाला चांगली सेवा देतोय हेच बघतो.
खर तर वाद सॅटेलाईट स्पेक्ट्रम कसा द्यायचा यावरून आहे. स्टारलिंकला वाटते की स्पेक्ट्रमचा लिलाव न होता थेट वाटप व्हावे, जसे जगात होते. तर रिलायन्स आणि एअरटेलचे म्हणणे आहे की लिलाव झालाच पाहिजे, नाहीतर परदेशी कंपन्यांना फायदा मिळेल. याच मुद्द्यावरून दोन्ही कंपन्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून खटके उडत आहेत.
आता रिलायन्सने जरी स्वागत केले असे म्हटले तरी त्यांनी एकप्रकारे इशारा पण दिला आहे. तुम्ही या, पण नियम पाळूनच या. जिओला जे नियम आहेत तेच तुम्हालाही असतील.पुढच्या काही महिन्यात भारतात सॅटेलाईट इंटरनेटची मोठी लढाई बघायला मिळणार आहे. एका बाजूला जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस एलॉन मस्क आणि दुसऱ्या बाजूला भारतातला सगळ्यात श्रीमंत माणूस मुकेश अंबानी. दोघेही मागे हटणारे नाहीत. यात फायदा मात्र ग्राहकांचाच होणार आहे, कारण स्पर्धा वाढली की इंटरनेट स्वस्त आणि चांगले मिळेल.






