State Bank Of India Mclr Interest Rate (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
SBI ने सगळ्याच दरात वाढ केलेली नाही. एक दिवसाचा आणि एक महिन्याचा MCLR आहे तसाच ठेवला आहे. त्यात कोणताही बदल नाही.पण जर तुमचा MCLR कालावधी 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तिथे 0.15% वाढ केली आहे. म्हणजे 15 बेसिस पॉईंट्सने व्याज वाढले आहे. हे जरी ऐकायला कमी वाटत असले तरी मोठ्या कर्जावर महिन्याला हजार रुपयांचा फरक पडू शकतो.
सगळ्यांनाच हा फटका बसणार नाही. ज्यांनी SBI कडून MCLR वर कर्ज घेतले आहे त्यांनाच याचा त्रास होईल. आजकाल बरीच होम लोन, कार लोन, पर्सनल लोन MCLR ला जोडलेली असतात. त्यांना फ्लोटिंग रेट लोन म्हणतात. अशा लोकांचे व्याज वाढणार.पण जर तुमचे कर्ज EBLR किंवा RLLR म्हणजे रेपो रेटला जोडलेले असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. या वाढीचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. EBLR वर असलेल्या लोकांना दिलासा आहे.
MCLR वाढल्यामुळे EMI वाढणार हे नक्की. दोन गोष्टी होऊ शकतात. एकतर तुम्हाला दर महिन्याला जास्त EMI भरावा लागेल किंवा बँक तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवेल. म्हणजे आधी 20 वर्ष कर्ज होते तर आता 21 वर्ष होईल.पण लगेचच EMI वाढेल असे नाही. बऱ्याच कर्जाचा रिसेट पीरियड असतो. म्हणजे 6 महिन्यांनी किंवा वर्षाने व्याज बदलते. त्यामुळे तुमचा रिसेट डेट येईपर्यंत जुणाच दर लागू राहील. त्यानंतर नवीन वाढलेला दर लागेल. आणि महत्वाचे म्हणजे ही वाढ कायमची नाहीये, काही काळासाठी असू शकते.
याच्या एक आठवडा आधी म्हणजे 7 ऑक्टोबर 2026 ला RBI ने पण आपला रेपो रेट वाढवला होता. 25 बेसिस पॉईंट्सने वाढवून 5.50% केला आहे. रेपो रेट म्हणजे RBI ज्या दराने बँकांना पैसे देते. RBI ने दर वाढवल्यामुळे बँकांना पैसे महाग मिळायला लागले. म्हणूनच SBI सारख्या मोठ्या बँका आपले दर वाढवत आहेत. पुढच्या काही दिवसात इतर बँका पण दर वाढवतील अशी शक्यता आहे.
Share Market Today: शेअर बाजाराची आज सकारात्मक सुरुवात होण्याचे संकेत; कोणते शेअर्स राहणार चर्चेत?
MCLR म्हणजे खूप लोकांना MCLR म्हणजे काय हेच माहिती नसते. सोप्या भाषेत सांगायचे तर बँकेला पैसे उभे करण्यासाठी जो खर्च येतो, त्यावरून हा दर ठरवला जातो. यात बँकेचा नफा, खर्च सगळे जोडलेले असते. हा एक बेस दर आहे. तुमचे कर्ज या दराशी जोडलेले असते. त्यामुळे MCLR वाढला की तुमचे कर्ज महाग होते आणि MCLR कमी झाला की कर्ज स्वस्त होते.त्यामुळे जर तुम्ही SBI चे कर्जदार असाल आणि तुमचे कर्ज MCLR वर असेल तर एकदा बँकेत जाऊन चौकशी करा. तुमचा नवीन EMI किती होणार आहे आणि तुम्ही EBLR वर शिफ्ट होऊ शकता का हे नक्की विचारा.
Ans: काही MCLR दरांमध्ये ०.१५ टक्क्यांची वाढ केली आहे.
Ans: SBI च्या MCLR शी जोडलेल्या कर्जदारांवर याचा परिणाम होऊ शकतो.
Ans: नाही. नवीन दर कर्जाच्या रीसेट कालावधीनुसार लागू होऊ शकतो.






