(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Sugar Price Drop : साखर स्वस्त होणार! एका झटक्यात 18 टक्क्यांनी घसरले भाव; पण कसं? जाणून घ्या कारण
२० रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा स्टॉक सध्या मार्केटमध्ये बराच चर्चेत आहे. सुपर टॅनरी हे या शेअरचं नाव आहे. हा पेनी स्टॉकमध्ये प्रचंड वाढ दिसून येत आहे. बुधवारी BSE वर सुपर टॅनरीचे शेअर्स १०% नी वाढले. त्याची किमती सध्या १३.१० रुपयांवर पोहोचली. कंपनीच्या शेअर्सने ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या ४ दिवसांत सुपर टॅनरीच्या शेअर्समध्ये ७१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना दोनदा बोनस शेअर्स देखील दिला आहे.
सध्या सपर टॅनरीच्या शेअर्समध्ये वाढ सुरुच आहे. ४ दिवसांत तब्बल ७१ % इतकी वाढ नोंदवली आहे. २० ऑगस्टला हा स्टॅक ७.६३ रुपयांवर बंद झाला होता. बुधवारी सुपर टॅनरीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आणि तो १३.१० रुपयांवर पोहोचला. गेल्या ५ दिवसांचे आकडे पाहता या शेअर्समध्ये जवळजवळ ७०%पेक्षा जास्त वाढ झाली.
सुपर टॅनरीने आपल्या शेअर्स होल्डरना दोन वेळा बोनस वितरीत केले आहेत. डिसेंबर २००८ मध्ये, कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सचे वितरण केले. म्हणजेच, कंपनीने प्रत्येक एका शेअरमागे एक बोनस शेअर शेअर्सहोल्डरना दिला. फेब्रुवारी २०१० मध्ये, सुपर टॅनरीने १:२ या प्रमाणात बोनस शेअर्सचे वितरण केले होते. कंपनीने प्रत्येक दोन शेअर्समागे एक बोनस शेअर वितरित केला होता. सुपर टॅनरीने आपल्या शेअर्सचे दोनदा विभाजनही केले आहे. मार्च २००८ मध्ये, कंपनीने आपल्या शेअर्सचे पाच भागांमध्ये विभाजन केले. नोव्हेंबर २०१० मध्ये, कंपनीने आपल्या शेअर्सचे दोन भागांमध्ये विभाजन केले होते.






