Bank UPI Transaction : UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय; काय परिणाम होणार?

Bank UPI Transaction : देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने UPI युजर्ससाठी एक महत्त्वाचा बदल केला असून, आता ₹५०० पर्यंतच्या लहान यूपीआय पेमेंट व्यवहारांवर ग्राहकांना SMS Alert पाठवले जाणार नाहीत. नेमकं काय आहे या मागचं कारण?
UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय
UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय( सौजन्य - सोशल मीडिया )
Published on: 
Updated on: 
  • UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय?

  • देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय

  • काय परिणाम होणार?

Bank UPI Transaction : तुम्हीही UPI वरुन पेमेंट करत असाल आणि ते पेमेंट ५०० रुपयांपर्यंतचं असेल तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. जर तुमचं खातं HDFC बँकेत असेल आणि तुम्हीही UPI पेमेंट करत असाल तर तुम्ही हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. HDFC बँकेने ₹500 किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या UPI व्यवहारांसाठी SMS अलर्ट पाठवण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम १ जानेवारी २०२७ पासून लागू होईल. नेमका काय आहे हा निर्णय आणि त्याचा नेमका काय परिणाम होणार ?

UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय
Finance Ministry Report Q3 Economy : भारतीय अर्थव्यवस्थेची गती पुन्हा सुसाट? वित्त मंत्रालयाच्या अहवालात महत्त्वाचे संकेत; बदलाचा पॅटर्न काय?

HDFC बँकेने ₹500 किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या UPI व्यवहारांसाठी SMS अलर्ट पाठवणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पण ग्राहकांना UPI व्यवहारांसाठी ईमेल सूचना मिळत राहतील. हा बदल भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहार अलर्ट संदर्भातील सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात आला आहे. HDFC बँकेने एका अधिसूचनेद्वारे ग्राहकांना या बदलाची माहिती दिली आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्ही ₹100, ₹200, ₹400 किंवा ₹500 चे UPI पेमेंट केले, तर तुमच्या बँक खात्यातून पैसे वजा झाल्याची माहिती देणारा SMS बँक तुम्हाला यापुढे पाठवणार नाही. पण, ₹500 पेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटसाठी SMS सूचना मिळत राहतील.

HDFC बँक SMS अलर्ट का बंद करतेय?

इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांसाठीच्या अलर्ट्ससंदर्भात RBI ने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार HDFC बँकेने हा बदल केला आहे. ही सुधारित मार्गदर्शक तत्त्वे केवळ UPI पेमेंटपुरती मर्यादित नाहीत; ती सर्वसाधारणपणे इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांना लागू होतात. कमी रकमेच्या व्यवहारांसाठी बँकांना स्वतःची SMS अलर्ट धोरणे ठरवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

नेमके बँकेचे धोरण काय?

सुधारित आराखड्यानुसार, ₹५०० पेक्षा जास्त रकमेच्या इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांसाठी बँकांना तात्काळ SMS अलर्ट पाठवणे बंधनकारक असेल. पण, ₹५०० किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांसाठी, बँका त्यांच्या स्वतःच्या धोरणांनुसार SMS सूचना पाठवायच्या की नाही हे ठरवू शकतात. मात्र, जर एखाद्या बँकेने ₹५०० किंवा त्यापेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांसाठी SMS अलर्ट देण्याचे ठरवले, तर ती बँक या सेवेसाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाही.

UPI ने 500 रुपयांपर्यंत पेमेंट करताय? देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचा मोठा निर्णय
Todays Gold-Silver Price: मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरांत सोन्याचे दर काय? एका क्लिकवर जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचा भाव