Share Market Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजाराला धक्का? सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीने सुरुवात होण्याची शक्यता
Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार सुरूच; ग्राहक झाले हैराण! आजचा भाव किती?
मागील सत्रात देशांतर्गत शेअर निर्देशांक सकारात्मक राहिले, बेंचमार्क निफ्टी ५० २४,१०० च्या पातळीच्या वर बंद झाला. सेन्सेक्स ३३०.९२ अंकांनी, म्हणजेच ०.४३ टक्क्यांनी वाढून ७७,२६४.५१ अंकांवर बंद झाला, तर निफ्टी ५० ८४.८० अंकांनी, म्हणजेच ०.३५ टक्क्यांनी वाढून २४,१७५.६५ अंकांवर स्थिरावला. (फोटो सौजन्य: Pinterest)
चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे, आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आज भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी आठ स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या या शेअर्समध्ये एचएफसीएल लिमिटेड, ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड, सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, इटरनल लिमिटेड, डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, रामकृष्णा फोर्जिंग्स लिमिटेड, आणि महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड यांचा समावेश आहे.
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी टाटा टेक्नॉलॉजीज, आस्क ऑटोमोटिव्ह, सॅजिलिटी, रामकृष्ण फोर्जिंग्ज आणि टीटीके हेल्थकेअर या पाच ब्रेकआउट शेअर्सची शिफारस केली आहे.






