फोटो सौजन्य - Social Media
Central Board of Secondary Education (CBSE) ने 2026 सालचा इयत्ता 10वीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा निकाल लवकर जाहीर करण्यात आला असून मे 2026 मध्ये होणाऱ्या दुसऱ्या बोर्ड परीक्षांमुळे मूल्यांकन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात आली. विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी किमान 33 टक्के गुण आवश्यक आहेत. एखाद्या विषयात 1-2 गुण कमी असल्यास ग्रेस मार्क्स देण्याची शक्यता देखील आहे. यावर्षी CBSE 10वीच्या परीक्षा 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2026 या कालावधीत घेण्यात आल्या होत्या.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट्सवर लॉगिन करणे आवश्यक आहे. तसेच DigiLocker, UMANG अॅप आणि SMS द्वारेही निकाल तपासता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांकडे रोल नंबर, स्कूल नंबर, अॅडमिट कार्ड आयडी, जन्मतारीख आणि स्क्रीनवर दाखवलेला सिक्युरिटी पिन असणे आवश्यक आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर DigiLocker वर डिजिटल मार्कशीट आणि सर्टिफिकेटही उपलब्ध होणार आहेत.
अधिकृत वेबसाइटवरून निकाल डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम results.cbse.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर “Secondary School Examination (Class X) 2026” या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी आणि सबमिट केल्यानंतर मार्कशीट स्क्रीनवर दिसेल. ही मार्कशीट डाउनलोड करून भविष्यासाठी जतन करून ठेवावी.
निकालाच्या PDF मध्ये एकूण शाळांची संख्या, परीक्षा केंद्रांची माहिती, एकूण उत्तीर्ण टक्केवारी, विभागनिहाय निकाल, 90% आणि 95% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, तसेच कम्पार्टमेंटमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय, मुला-मुलींचे प्रमाण, राज्यनिहाय आकडेवारी आणि विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीची माहितीही यात समाविष्ट असेल.
CBSE कडून निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






