फोटो सौजन्य - Social Media
मुंबई, नीता परब : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सीबीएसई संलग्न ११ शाळांच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई मंडळाच्या इयत्ता दहावी परीक्षेत २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत मनपा शाळांचा एकूण निकाल ९२.८९% इतका लागला असून, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रगतीमुळे उल्लेखनीय यश संंपादन करण्यात अाले असल्याचे िशक्षण िवभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात अाले.
मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय प्रमाण असल्याची माहिती पािलका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी िदली अाहे. विद्यार्थ्यांचे हे यश शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे फलित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांिगतले. महानगरपालिकेचे आयुक्त तसेच शिक्षण अधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मनपा शिक्षण विभाग दर्जेदार व सर्वसमावेशक शिक्षण देण्यास कटिबद्ध असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे िशक्षण िवभागातील वरिष्ठ पािलका अधिकारी सांगतात.






