फोटो सौजन्य- सोशल मीडिया
GATE 2027 Registration Started: देशातील प्रतिष्ठित तांत्रिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे आणि अनेक सरकारी संस्थांमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘गेट २०२७’ ही एक महत्त्वाची संधी आहे. ‘ग्रेजुएट एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग’ म्हणजेच गेट २०२७ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच २७ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झाली आहे. यावर्षी या परीक्षेचे आयोजन ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास’ कडून केले जात आहे. उमेदवार अधिकृत ‘GATE ऑनलाइन ॲप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टम’ पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करू शकतात.
गेट २०२७ साठी विना विलंब शुल्क अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवार ५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लेट फीसह अर्ज करू शकतील. अर्जात सुधारणा करण्याची सुविधा १४ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उपलब्ध राहील. परीक्षा फेब्रुवारी २०२७ मध्ये वेगवेगळ्या दिवशी होणार असून, परीक्षेच्या तारखा ६, ७, १३, १४, २० आणि २१ फेब्रुवारी २०२७ अशा आहेत.
गेट २०२७ मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांसाठी कोणतीही कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला, विज्ञान, वाणिज्य किंवा संबंधित मान्यताप्राप्त पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, जे विद्यार्थी सध्या त्यांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात किंवा त्यानंतरच्या वर्षात शिकत आहेत, ते देखील या परीक्षेसाठी पात्र आहेत. उमेदवार ठरवलेल्या नियमांनुसार एक किंवा दोन टेस्ट पेपर निवडू शकतात.
गेट २०२७ ची अर्ज फी उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वेगवेगळी आहे:
MCQ प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यास निगेटिव्ह मार्किंग लागू होईल. एका गुणाच्या MCQ चे उत्तर चुकीचे असल्यास एक-तृतीयांश (1/3) गुण आणि दोन गुणांच्या MCQ चे उत्तर चुकीचे असल्यास दोन-तृतीयांश (2/3) गुण कापले जातील. तर MSQ आणि NAT प्रश्नांची चुकीची उत्तरे दिल्यास कोणतीही निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. परीक्षा देशातील विविध निर्धारित केंद्रांवर घेतली जाईल.
SSC CGL परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहतायं? मग चुकूनही करू नका ‘या’ पाच चुका!
1. सर्वप्रथम उमेदवार GATE २०२७ च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन GOAPS पोर्टल उघडावे.
2. त्यानंतर DigiLocker च्या मदतीने नवीन नोंदणी पूर्ण करून लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करावा.
3. अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
4. त्यानंतर अलीकडील फोटो आणि आवश्यक प्रमाणपत्रे अपलोड करावीत.
5. उमेदवारांनी परीक्षा शहराचा पर्याय निवडून अर्ज शुल्काचा भरणा करावा.
6. फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रत डाउनलोड करून किंवा प्रिंट काढून सुरक्षित ठेवावी.
गेट स्कोरचा वापर उच्च शिक्षण आणि करिअरच्या अनेक संधींसाठी केला जातो. पात्र उमेदवार IITs आणि IISc सह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये पोस्ट ग्रॅजुएट स्तरावरील अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी याचा वापर करू शकतात. याशिवाय काही सरकारी संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSUs) भरती प्रक्रियेत गेट स्कोरचा निकष म्हणून वापर करतात.






