फोटो सौजन्य- सोशल मीडिया
GMC Sindhudurg Bharti 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग अंतर्गत विविध विभागांतील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) या पदांच्या एकूण ३३ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध वैद्यकीय शाखांमध्ये ही पदे भरली जाणार असून, यामध्ये शरीरक्रियाशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, जनऔषध वैद्यकशास्त्र, बालरोगविकित्सशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, कान-नाक-घसाशास्त्र, नेत्रशल्यविकित्सशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, वधिरिकरणशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, मानसशास्त्र, त्वचाशास्त्र, क्षयरोगशास्त्र, शस्त्रक्रियाशास्त्र, हाडवैद्य, रक्तविकारशास्त्र आणि पोषणशास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ ऑगस्ट २०२६ रोजी ६९ वर्षांपेक्षा जास्त नसावे अशी मर्यादा घालण्यात आली आहे. निवड प्रक्रियेबाबत सांगायचे तर, उमेदवारांची कोणतीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही तर थेट मुलाखतीद्वारे त्यांची निवड केली जाईल.
मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रतिमहिना आकर्षक मानधन मिळणार असून, प्राध्यापक पदासाठी तब्बल २,००,००० रुपये तर सहयोगी प्राध्यापक पदासाठी ९८,५०० रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही विभागानुसार वेगवेगळ्या वैद्यकीय पदव्या (उदा. M.D., M.S., DNB किंवा Ph.D.) असणाऱ्या उमेदवारांसाठी खुली आहे.
या भरतीसाठीची थेट वॉक-इन-इंटरव्यू (मुलाखत) आज म्हणजेच २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीचे ठिकाण ‘अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ए/पी ओरस, ता. कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग’ हे असून इच्छुक उमेदवारांनी आपले बायोडाटा आणि सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रांसह निर्धारित वेळी उपस्थित राहावे. याविषयीची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरातीसाठी उमेदवार http://gmcsindhudurg.edu.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
SSC CGL परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहतायं? मग चुकूनही करू नका ‘या’ पाच चुका!






