पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! DRDO अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, वाचा... सविस्तर

अहमदनगर येथील डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास आस्थापने अंतर्गत पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असणार आहे.
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! DRDO अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, वाचा... सविस्तर
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी! DRDO अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरू, वाचा... सविस्तर
Published on: 
Updated on: 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असणार आहे.

संस्थेचे नाव - DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर

भरली जाणारी पदे - पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी

रिक्त पद संख्या - 52 पदे

अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख - 12 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2024

नोकरी करण्याचे ठिकाण - अहमदनगर

भरतीचा तपशील

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी - 32 पदे रिक्त

डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी - 20 पदे रिक्त

काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी - Degree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer/General Stream

डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी - Degree in Mechanical/Electrical/Automobile/Electronics/ Computer

किती मिळणार पगार

पदवीधर शिकाऊ प्रशिक्षणार्थी - स्टायपंड 9,000 रुपये प्रति महिना

डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी - स्टायपंड 8,000 रुपये प्रति महिना

कसा कराल अर्ज

डीआरडीओच्या वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर येथील भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचाव्या. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा - https://nats.education.gov.in/

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.drdo.gov.in ला भेट द्या.