नोकरीची सुवर्णसंधी! कोचीन शिपयार्डमध्ये मोठी भरती; 'ही' आहे अर्ज करण्याची शेवटची तारिख!
इंजिनियरिंचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. तुम्ही इंजिनियरिगचे शिक्षण घेतले असेल आणि तुम्ही नोकरीच्या शोधात असाल. तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या जहाजबांधणी आणि देखभाल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये मोठी भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ पदाच्या एकूण 140 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असणार आहे. त्यामुळे आता तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.
हेही वाचा – अहमदनगर महापालिकेत व्हेटर्नरी डॉक्टर पदासाठी भरती; मिळणार 50,000 रुपये पगार
संस्थेचे नाव – कोचीन शिपयार्ड लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1. पदवीधर शिकाऊ
2. तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ
एकूण रिक्त पद संख्या – 140 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 ऑगस्ट 2024
भरतीचा तपशील
पदवीधर शिकाऊ – 69 रिक्त जागा
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – 71 रिक्त जागा
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पदवीधर शिकाऊ – Degree (Engineering or Technology)
तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ – Diploma (Commercial Practice)
कसा कराल अर्ज
कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या जहाजबांधणी आणि देखभाल सुविधा पुरवणाऱ्या कंपनीमध्ये होणाऱ्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरातीची पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे कोचीन शिपयार्ड लिमिटेडकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे उमेद्वारांनी विहित वेळेत आपला अर्ज कागदपञांसहित दाखल करावा.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात – https://cochinshipyard.in/uploads/career/51feb717efea11f31574fdede413085c.pdf
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://nats.education.gov.in/
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://cochinshipyard.in/ ला भेट द्या.