फोटो सौजन्य- सोशल मीडिया
सुरुवातीला ‘एक’ वर्षाच्या अवधीकरिता ही नियुक्ती केली जाणार असून, संस्थेची आवश्यकता आणि उमेदवारांच्या व्यक्तिगत कामगिरीच्या आधारावर हा कार्यकाल कमाल चार वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. या भरतीमध्ये कार्यकाळ आधारित पदवी व पदविका प्रकल्प अभियंता पदांचा समावेश असून, एकूण रिक्त जागांसाठी प्रवर्गनिहाय पदे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये युआर, ओबीसी, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
MPSC paper leak घोटाळा; २७० पानांच्या व्हॉट्सॲप चॅटने उघड केले ९१ प्रश्नांचे गूढ!
शैक्षणिक अर्हतेबाबत बोलायचे तर, संबंधित ट्रेडमधील केमिकल इंजिनिअरिंग पदवी (बी.ई./बी.टेक.) किंवा पदविका, तसेच केमिस्ट्रीसह बीएससी ग्रॅज्युएट्स या पदांसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय दारूगोळा आणि स्फोटकांची निर्मिती किंवा हाताळणीमध्ये अप्रेंटिसशिप केलेल्या उमेदवारांना निकषानुसार प्राधान्य दिले जाणार आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे असून, नियमांनुसार एससी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे आणि ओबीसी-एनसीईएल उमेदवारांना ३ वर्षांची वयात शिथिलता देण्यात आली आहे.
उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशनाच्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत ठेवली आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, अर्जाचा नमुना आणि अटी व शर्तींसाठी muneshionsindia.in किंवा ddpdoo.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






