फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Railway Station Master Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेल्वेकडून यंदा प्रथमच आरआरबी अजमेरला स्टेशन मास्टर भरती परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही अहवालांनुसार, रेल्वे भरती बोर्ड अजमेर याच महिन्यात १२५० हून अधिक स्टेशन मास्टर पदांसाठी अधिकृत भरतीची जाहिरात जारी करू शकते. विशेष म्हणजे, स्टेशन मास्टर पदाची भरती स्वतंत्रपणे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत स्टेशन मास्टरची भरती आरआरबी एनटीपीसी अंतर्गत होत असे, परंतु यावर्षी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.
अहवालांनुसार, सध्या देशभरात एकूण २१ रेल्वे भरती बोर्ड आहेत. अशा स्थितीत, २१ बोर्डांशी संबंधित उमेदवारांची परीक्षा घेण्याची जबाबदारी अजमेर आरआरबीसाठी एक खूप मोठी कामगिरी मानली जात आहे. या भरतीमध्ये २५ लाखांहून अधिक उमेदवार सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, रेल्वे भरती बोर्ड अजमेरचे अध्यक्ष संजीव कुमार यांच्या मते, या भरतीचे नोटिफिकेशन याच महिन्यात जारी होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये १२५० हून अधिक पदे भरली जातील आणि ही भरती ‘ग्रुप सी’ साठी असेल.
रेल्वे भरती बोर्डाच्या म्हणण्यानुसार, स्टेशन मास्टर्सच्या आगामी भरतीसाठी यंदा परीक्षा दोन टप्प्यांऐवजी एकाच टप्प्यात घेतली जाऊ शकते. काही अहवालांनुसार असे म्हटले जात आहे की, यावेळी स्टेशन मास्टर भरतीमध्ये लेखी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवार आता सीबीटी-१ (CBT-1) आणि सीबीटी-२ (CBT-2) ऐवजी केवळ एकच सिंगल कॉम्प्युटर आधारित परीक्षा देतील. ही परीक्षा १०० गुणांची असेल आणि त्यासाठी २ तासांचा वेळ मिळेल, असे मानले जात आहे. तसेच या परीक्षेत बेसिक सायन्स, गणित आणि डेटा विश्लेषणावरून ६० गुण, लॉजिकल क्षमतावरून २० गुण आणि मेंटल रीझनिंगवरून २० गुणांचे प्रश्न विचारले जाण्याती शक्यता आहे. याशिवाय, लेखी परीक्षेच्या आधारावर रिक्त जागांच्या ८ पट अधिक उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड ॲप्टिट्यूड टेस्टसाठी बोलावले जाईल, असेही समोर आले आहे.
SBI SCO Recruitment 2026: SBI मध्ये AI एक्सपर्ट पदाची भरती; परीक्षा न देता मुलाखतीद्वारे थेट निवड!
रेल्वे स्टेशन मास्टरच्या या भरतीसाठी पदवीधर असणारे उमेदवार अर्ज करू शकतील, असे सांगण्यात आले आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना वेतन पे लेव्हल-६ आणि वैद्यकीय मानक ए-२ च्या आधारावर वेतन दिले जाईल. याची मूळ वेतन ३५,४०० रुपये असेल. या परीक्षेत शैक्षणिक पात्रतेचे वेटेज ७० टक्के आणि सीबीटी परीक्षेचे वेटेज ३० टक्के निश्चित करण्यात आले आहे.
Ans: यंदा प्रथमच रेल्वे भरती बोर्ड अजमेर (RRB Ajmer) कडे देशभरातील २१ बोर्डांसाठी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Ans: यावेळी दोन टप्प्यांऐवजी (CBT-1 व CBT-2) ऐवजी केवळ एकच १०० गुणांची संगणक आधारित (CBT) परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे.






