लोहगाव विमानतळावर बॉम्ब असल्याची अफवा; सुरक्षा यंत्रणेची धावपळ, दोघांवर गुन्हा दाखल

इंडिगो एअरलाइन्सच्या गुरुग्राम येथील अधिकृत सोशल मिडीयाच्या खात्यावर ॲडम अलांझा नावाने मॅसेज पाठविला होता. विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकी त्यात देण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक विमानांची तपासणी करण्यात आली.
लोहगाव विमानतळावर बॉम्ब असल्याची अफवा; सुरक्षा यंत्रणेची धावपळ, दोघांवर गुन्हा दाखल
लोहगाव विमानतळावर बॉम्बची अफवा (फोटो- istockphoto )
Published on: 
Updated on: 

पुणे: लोहगाव आंतराष्ट्रीय विमानतळावर विमानात बाँम्ब ठेवल्याची अफवा पुन्हा पसरविण्यात आली असून, बॉम्ब असल्याचा मॅसेज आला आहे. सात विमानात बाँम्ब ठेवण्यात आल्याचा मॅसेज दोन खासगी विमान कंपन्यांना पाठविले असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे बॉम्बच्या अफवेमुळे परिणाम विमान वाहतूक सेवेवर झाला असून, प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी श्रीकांत चंद्रशेखर वडगावकर (वय ३७) यांनी विमानतळ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार ॲडम अलांझा १००० या नावाने सोशल मिडीयावरील खाते धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

इंडिगो एअरलाइन्सच्या गुरुग्राम येथील अधिकृत सोशल मिडीयाच्या खात्यावर ॲडम अलांझा नावाने मॅसेज पाठविला गेला होता. विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकी त्यात देण्यात आली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर पाटणा ते पुणे, बंगळुरु ते पुणे, कोलकात्ता ते पुणे या विमानांची तपासणी करण्यात आली. प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले. यामुळे विमान सेवेवर परिणाम झाला, असे तक्रारीत म्हटले आहे. अशाच प्रकारचा मॅसेज पाठविल्याचे विमानतळ पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. २००८ बाँम्बिंग या खात्यावरुन मॅसेज पाठविल्याचे उघडकीस आले आहे. विस्तारा एअरलाइन्स कंपनीची सिंगापूर ते पुणे, अकासा एअरलाइन्सचे कोलकात्ता ते पुणे, इंडिगो एअरलाइन्सचे पुणे ते जोधपूर, कोलकात्ता ते पुणे या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक करपे तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये १२० विमानांना बॉम्बच्या धमक्या

गेल्या एका आठवड्यात भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले की, बॉम्बच्या धमक्या अफवा आहेत, परंतु त्या हलक्यात घेता येणार नाहीत. देशभरातील विविध विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या येण्याची प्रक्रिया अनेक दिवसांपासून सुरू आहे. सोमवारी रात्रीही ३० विमानांना बॉम्बच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. इंडिगो, विस्तारा आणि एअर इंडियाच्या विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (21 ऑक्टोबर) रात्री इंडियन एअरलाइन्सच्या 30 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.

१२० हून अधिक विमानांना धमक्या

गेल्या एका आठवड्यात भारतीय विमान कंपन्यांच्या १२० हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांनी सोमवारी सांगितले की बॉम्बच्या धमक्या अफवा आहेत, परंतु त्या हलक्यात घेता येणार नाहीत. दरम्यान, सरकार विमान कंपन्यांना बॉम्बच्या धमक्यांचा सामना करण्यासाठी कायदेशीर कारवाईची योजना आखत आहे, ज्यात गुन्हेगारांना नो-फ्लाय लिस्टवर ठेवण्यात आले आहेत.