File Photo : firing
अमेरिकेत (America) गर्भपाताविषयी कडक नियम आहेत. तेथे अनेक राज्यात मुलींना गर्भपात (Abortion) करण्याची परवानगी नाही. हे नियम टेक्सास राज्यातही लागू आहेत. टेक्सासने सप्टेंबर २०२१ पर्यंत गर्भधारणेच्या सहा आठवड्यांनंतर गर्भपातावर बंदी घातली. तथापि, नंतर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत सूट देण्यात आली आहे. मात्र, आता या नियमांमुळे 26 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. या मुलीने दुसऱ्या राज्यात जाऊन गर्भपात केल्याानंतर संतापलेल्या प्रियकराने तिची गोळ्या झाडून हत्या केली. गॅब्रिएला गोन्झालेझ असं मृत मुलीच नाव आहे. या प्रकरणी 22 वर्षीय हॅरोल्ड थॉमसनला अटक करण्यात आली आहे.
[read_also content=”एकमेकांना रस्त्यावर लाथाडत होत्या मुली, तेव्हड्यात पोलीस आला आणि त्यानं असं काही केलं की… “]
मिळालेल्या माहितीनुसार, गॅब्रिएलाने गर्भपात करण्यावरुन तिच्या आणि प्रियकर हॅरोल्डमध्ये आधी वाद झाला. या वेळी संतापच्या भरात प्रियकराने तिला कारमधून ढकलून दिले आणि बंदूक बाहेर काढली. यावेळी तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या डोक्यात गोळी घातली. त्याने गोन्झालेझवर अनेक वेळा गोळ्या झाडल्या. त्यानंतर तित्या डोक्यात गोळी झाडली.
हे प्रकरण उजेडात आल्यानंतर आरोपी प्रियकर थॉमसनला बुधवारी पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी सध्या डॅलस तुरुंगात करण्यात आली आहे. घटनास्थळी मुलीची बहीण हजर होती, असे सांगण्यात येत आहे. तिने गोळीबाराचा आवाज ऐकला. तर, दुसर्या एका व्यक्तीने सांगितले की गोन्झालेझकडे फोन नव्हता, जेणेकरून ती पोलिसांना कॉल करू शकेल. थॉमसनवर यापूर्वीही गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर कुटुंबातील सदस्यावर हल्ला आणि गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे.






