Dhule Crime: राज्यात पहिल्यांदाच 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६' नुसार गुन्हा! पहाटे दोन वाजता तक्रार अन् अवघ्या तासाभरात...

२० हजारांचे आमिष अन् धर्मांतरासाठी दबाव! धुळ्यात अल्पवयीन मुलीला धमकी देऊन भावाला मारहाण; राज्यात पहिल्यांदाच 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६' अन्वये गुन्हा दाखल करत आरोपीला तासाभरात अटक!
Crime News
सौजन्य फोटो - AI Gemini Crime
Published on: 
Updated on: 

Dhule Crime: धुळे शहरात मागील दोन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींना पैशांचं आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी राज्यात प्रथमच 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६' च्या कलम ३ व ५ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य संशयिताला देवपूर पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमका प्रकार काय आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३८ वर्षीय आरोपी भुऱ्या उर्फ अख्तर गुलाब मिर्झा हा तक्रारदार महिलेच्या शेजारी राहतो. तो मागील काही दिवसांपासून तक्रारदार महिलेच्या १४ वर्षीय मुलीची छेड काढत होता. त्याने तिच्याकडे लग्नाचा हट्ट धरला होता तसेच धर्मांतर करण्यास प्रवृत्त करत होता. वारंवार नकार देऊनही तो तिच्यावर दबाव टाकत होता, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे.

२० हजारांचे आमिष, धमकी आणि भावाला मारहाण

आरोपीने '२० हजार रुपये देतो, धर्मांतर कर' असे आमिष दाखवले. गेल्या महिन्यातही अख्तरने पीडितेचा हात धरून लग्नाची गळ घातली होती. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला समज दिली होती, तरीही तो पीडितेचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. सोमवारी (दि. २३) दुपारी पुन्हा आरोपीने पीडितेचा हात धरून धर्मांतरास सांगितले आणि रात्री घरापर्यंत येत धिंगाणा घातला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सोमवारी रात्री अंगणात भांडी घासणाऱ्या पीडितेला 'गल्लीत दिसली तर उचलून नेईन', अशी धमकी दिली. याबाबत जाब विचारल्यावर आरोपी अख्तर आणि त्याची बहीण फरिदा शेख यांनी शिवीगाळ करत पीडितेच्या भावाला मारहाण केली.

पहाटे गुन्हा दाखल अन् तासाभरात अटक मंगळवारी

(दि. २४) पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल होताच, अवघ्या तासाभरात म्हणजेच पहाटे तीन वाजता अख्तरला देवपूर पोलिसांनी अटक केली. पोलीस अधिकारी प्रतापसिंग मोहिते या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६' नुसार अख्तरवर गुन्हा दाखल केला असून, या कलमान्वये जबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास कलम ३ नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास सात वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद नमूद करण्यात आली आहे.

Q

धुळे प्रकरणात कोणत्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

A

या प्रकरणात राज्यात प्रथमच 'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६' च्या कलम ३ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Q

पोलिसांनी कोणत्या आरोपीला अटक केली आणि न्यायालयाने कोणती शिक्षा/कोठडी सुनावली?

A

देवपूर पोलिसांनी मुख्य आरोपी भुऱ्या उर्फ अख्तर गुलाब मिर्झा (वय ३८) याला अवघ्या तासाभरात अटक केली असून, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Q

या कायद्याच्या कलम ३ नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास काय शिक्षेची तरतूद आहे?

A

जबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्याचे कलम ३ नुसार सिद्ध झाल्यास सात वर्षे कारावास आणि एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.