काय घडलं नेमकं?
आमिष दाखवून किंवा फूस लावून पळवून नेल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. परंतु, धुळे शहरातील संजीवनीच्या बाबतीत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. सीसीटीव्हीमध्ये संजीवनी घराबाहेर पडताना स्पष्ट दिसते. त्याचवेळी समोरून एक वृद्ध व्यक्ती जाताना दिसतो. तो व्यक्ती गेल्यानंतर संजीवनी अचानक चालू लागते. चालताना तिचा एक हात हवेत असा आहे, जणू कोणीतरी तिचा हात धरून तिला ओढत नेत आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेत ती मुलगी गुंगीत किंवा झोपेत असल्यासारखी भासते.
Solapur Crime: ‘लग्न करतो’ म्हणत शोषण! तरुणीवर अत्याचार करून जबरदस्ती गर्भपात; काय घडलं नेमकं?
pic.twitter.com/XmzyK1kWQP — Naresh Shende (@NareshShen87640) April 17, 2026
संमोहनाद्वारे केलेले अपहरण
संजीवनीचे कुटुंबिय आणि नातेवाईक आणि पोलीस सर्वत्र तिचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातारावण आहे. काही प्रत्यक्षदर्शी आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मते,हे संमोहनाद्वारे केलेले अपहरण असू शकते. मुलगी स्वतःच्या शुद्धीत नसून तिला जाणीवपूर्वक एखाद्या प्रभावाने नेल्याची चर्चा नागरिक करत आहेत. दुसरीकडे, ती मुलगी एखाद्या खोल विचारात असावी व त्या तंद्रीतच घराबाहेर पडली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. संजीवनी हिच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास तातडीने कुटुंबाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
धक्कादायक! गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक; अविवाहित 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका अविवाहित तरुणीने गर्भपाताच्या अधिक गोळ्यांचे सेवन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत तरुणी हि १८ वर्षांची असून ती सहा महिन्यांची गरोदर होती. अधिक प्रमाणात औषधांची तिचा रक्तदाब कमी होऊन झटके येऊ लागले. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने मोहाडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Dharashiv Crime: परंड्यात तहसीलदारांची गाडी अडवून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल






