झारखंडमध्ये प्रेयसीसाठी पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह खोल खड्ड्यात पुरला. संशय टाळण्यासाठी कुत्र्यालाही मारून पुरण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशी करत आहे.
फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडित अलपवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आले. याच सततच्या त्रासाला कंटाळून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली.
बँक ऑफ इंडियात 514 क्रेडिट ऑफिसर पदांसाठी भरती सुरू असून अर्जाची अंतिम तारीख 5 जानेवारी 2026 आहे. ही भरती अनुभवी उमेदवारांसाठी असून निवड परीक्षा व मुलाखतीद्वारे होणार आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये हुंड्याच्या मागणीसाठी विवाहितेचा अमानुष छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पती, सासू-सासऱ्यांनी मारहाण, उपाशी ठेवणे व घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दापोडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सांगलीच्या मिरज तालुक्यात उसाच्या शेतात सापडलेल्या कुजलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा झाला. घटनास्थळी मिळालेल्या रेल्वे तिकिटामुळे पती व सासऱ्याने पूर्वनियोजित कट रचून खून केल्याचे स्पष्ट झाले.
छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात पोलिस नाईक नानासाहेब दिवेकर यांची निर्घृण हत्या करून मृतदेह घराशेजारी पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तीन संशयित ताब्यात; कारण अद्याप अस्पष्ट.
नांदेडच्या लंगर साहेब गुरुद्वारा परिसरात दोन गटांत वादातून गोळीबार झाला. भररस्त्यात राडा झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी 24 तासांत सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही गटांतील 10 आरोपींना अटक केली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आज भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील एकवीरा देवी मंदिर परिसरामध्ये प्रचाराचा शुभारंभ करून जाहीर सभा घेणार आहे.
राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करणाऱ्या घडामोडीत, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल झाले. या ऐतिहासिक भेटीमुळे ठाकरे बंधूंमधील राजकीय संबंध...
वसईत जामिनासाठी दिलेल्या पैशांच्या वादातून भावाने बहिणीवर गोळीबार केला. काचेमुळे जीव वाचला. आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली असून त्याच्याकडून जिवंत हँड ग्रेनेड व गावठी रिव्हॉल्व्हर जप्त झाले.
कल्याणमध्ये नोकरी व संपत्तीच्या वादातून सासूनेच मित्राच्या मदतीने सुनेची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हत्येनंतर मृतदेह वालधुनी पुलाखाली फेकून दिला असून दोन्ही आरोपी अटकेत आहेत.
जामखेड शहरात नव्या कोर्ट परिसरातील शेतात बाप-लेकाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कौटुंबिक वादानंतर मुलाने आधी जीवन संपवलं, मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनीही टोकाचं पाऊल उचललं.
पालघरच्या तलासरीत शालेय क्रीडा स्पर्धेत मॅरेथॉन पूर्ण करून तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या 15 वर्षीय रोशनी गोस्वामीचा काही क्षणांतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. घटनेने शाळा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.