सौजन्य फोटो - सोशल मिडीया
मुलाखतीदरम्यान अचानक हल्ला
टिळक रस्त्यावर एका माध्यम संस्थेला मुलाखत देत असताना बापट यांच्यावर चव्हाण याने अचानक हल्ला केल्याचे सांगण्यात येते आहे. गणेशोत्सव आणि डीजेबंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. बापट यांच्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेश मंडळाशी संबंधित असल्याची माहिती
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार संतोष चव्हाण हा राऊतवाडी परिसरातील ‘प्रियदर्शनी गणेश मंडळाचा माजी अध्यक्ष राहिला आहे. सध्या तो एका स्थानिक बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाशी त्याचा पूर्वीपासून संबंध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण होते, हे अद्याप तपासातून स्पष्ट झालेले नाही. डीजेबंदीच्या भूमिकेचा राग, गणेशोत्सवाशी संबंधित एखादे वक्तव्य किंवा अन्य कोणता वैयक्तिक अथवा स्थानिक वाद यापैकी नेमके कारण कोणते, याचा तपास पोलिस करत आहेत.
आणखी कोणाचा सहभाग?
हल्ला अचानक झाला की त्यामागे पूर्वनियोजित कारण होते, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी, उपलब्ध माहिती आणि बापट यांच्या जबाबाच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर संशयिताने बापट यांच्याविरोधात आक्रमक वक्तव्य केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, या वक्तव्यांची आणि हल्ल्यामागील कारणांची अधिकृत पडताळणी पोलिस तपासातून होणे बाकी आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील तपासानंतरच हल्ल्याचे नेमके कारण आणि इतर व्यक्तींचा सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






