काय घडलं नेमकं?
साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. साई हा शाळेतून घरी आला त्यांनतर कपडे बदलून खेळायला शेताच्या दिशेने गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी न परतल्याने शोधाशोध सुरू झाली. तेव्हा त्याचा थेट शेतात मृतदेह आढळून आला. तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली. साईचा मृतदेह ज्या अवस्थेत आढळला, त्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली अआहे. त्यामुळे ही हत्या असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
पोलीस आणि दहिवडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेचा पूर्ण उलगडा होत नाही आणि तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत मृतदेह घटनास्थळावरून हलवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे. जोपर्यंत दोषींना पकडले जात नाही, तोपर्यंत पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार नसल्याची भूमिका स्थानिकांनी घेतली आहे.
तपास सुरु
या घटनेचा तपास पोलीस आणि वन विभागाची टीम करत आहे. मुलाचा मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यात आलेला नसून पंचनामा व पुढील तपास प्रक्रिया सुरु आहे. हत्या आहे की अपघात याचा देखील पोलीस तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भोसरीत पोलिसांची मोठी कारवाई; शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे ही घटना घडली.
Ans: शाळेतून घरी आल्यावर खेळायला गेलेल्या मुलाचा बराच वेळ शोध घेतल्यानंतर शेतात मृतदेह आढळून आला.
Ans: मुलाच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.






