पुणे कोर्ट हल्ला प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी अन् ८ आरोपी गजाआड

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५० हजारांची सुपारी अन् मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी! पुणे कोर्ट हल्ल्यात कडेठाणमधून आणखी एकाला अटक करत संख्या ८ वर; गोळी चुकली आणि कोयत्याने केला हल्ला.
 Mandar Kiwale Attack
सौजन्य फोटो - सोशल मिडीया Mandar Kiwale Attack
Published on: 
Updated on: 
  • मंदार किवळे हल्ल्यात प्रथमेश येणपुरेला अटक; एकूण ८ आरोपी गजाआड व एक अल्पवयीन ताब्यात

  • भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५० हजारांची सुपारी

  • कात्रजमध्ये अर्ध्या गुंठ्याच्या वादातून झालेल्या शुभम चव्हाणच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला

पुणे: पुण्यात बुधवारी (ता. २५) शिवाजीनगर कोर्टासमोर झालेल्या मंदार किवळे हल्ला प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) आणखी एका आरोपीला कडेठाण (ता. दौंड) येथून अटक केली. प्रथमेश दीपक येणपुरे (वय १९, रा. कात्रज, मूळ पाबे, ता. वेल्हा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता आठ झाली आहे. दरम्यान, भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंदार किवळे याच्या हत्येची चव्हाण कुटुंबियांच्या नातलगांनी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

 Mandar Kiwale Attack
रात्री रिक्षा चालवण्यासाठी गेला अन् सकाळी कॅनॉलमध्ये सापडला मृतदेह; परभणीत अनैतिक संबंधातून रिक्षाचालकाचा भयानक अंत!

अटक आरोपींची यादी व जेल कनेक्शन

या प्रकरणात आतापर्यंत अक्षय सुभाष चव्हाण (वय २०), अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४८), स्वप्नील बाजीराव गवळी (वय २८), ओंकार उर्फ बब्या संतोष पवार (वय १८), सूरज साधू मळेकर (वय २२), सत्यम सदाशिव मोरे (वय २५) आणि प्रथमेश दीपक येणपुरे (वय १९) यांना अटक करण्यात आली आहे. तर अर्थव सोपान मारणे (वय १९) हा येरवडा कारागृहात असून, त्याच्यासह एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी; गोळी चुकली आणि कोयत्याने हल्ला

पोलिस तपासानुसार, २० एप्रिल २०२५ रोजी कात्रजमधील संतोषनगर येथे अर्ध्या गुंठ्याच्या वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून झाला होता. या प्रकरणात मंदार किवळे सहभागी होता. त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने अक्षय चव्हाण याने मंदारचा खून करण्याचे नियोजन केले. यासाठी मध्य प्रदेशातील उमरटी येथून ओंकार उर्फ बब्या पवार याने प्रत्येकी २५ हजार रुपयांना एक याप्रमाणे पिस्तूल खरेदी केल्याची माहिती आहे. बब्या पवार हा शुभम चव्हाण याचा बेस्ट फ्रेंड होता. त्यानंतर आरोपी अक्षय चव्हाण याच्या घरी बैठक घेऊन हल्ल्याची आखणी करण्यात आली. आधी पिस्तुलातून गोळ्या झाडल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या करायची असे ठरले होते. मात्र, हल्ल्यावेळी झाडलेली गोळी चुकली आणि मंदार किवळेला वेळेत उपचार मिळाल्यामुळे तो बचावला, तर आरोपींनी कोयत्याने वार केले.

 Mandar Kiwale Attack
रात्रीच्या अंधारात वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर दगडांचा वर्षाव! समृद्धी महामार्गावर ८ ते १० वाहनांवर दगडफेक

अर्ध्या गुंठ्याच्या वादातून टोळीयुद्धाचा भडका

कात्रजमधील संतोषनगर परिसरातील दोन गुंठे जमिनीतील अर्ध्या गुंठ्याच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर आता टोळीयुद्धात झाले आहे. २०२५ मध्ये पुण्याच्या कात्रज भागात मालमत्तेच्या वादातून लाकडी ओंडके, बांबूच्या काठ्या आणि स्टंपने मारहाण करून शुभम चव्हाण याचा खून केल्याप्रकरणी चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली होती. शुभम हा संतोषनगर येथील रहिवासी असून त्याचे त्या भागात रेस्टॉरंट होते. घराशेजारील जमिनीवरून शुभम चव्हाण आणि अमर साकोरे नावाच्या तरुणासोबत वाद होता. त्यातून झालेल्या हत्येनंतर आरोपी पळून गेले होते आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती येथून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. शुभमच्या हत्येचा बदला घेण्याचा निर्धार भावाने व मित्रांनी केला होता आणि मंदार किवळे तुरुंगातून बाहेर येताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला

Q

मंदार किवळे हल्ला प्रकरणात दौंडमधून कोणास अटक करण्यात आली?

A

यवत पोलिसांनी गुरुवारी (दि. २६) दौंड तालुक्यातील कडेठाण येथून प्रथमेश दीपक येणपुरे (वय १९) याला अटक केली असून, यामुळे अटक आरोपींची संख्या आठ झाली आहे.

Q

हल्ल्यासाठी पिस्तुले कोठून आणण्यात आली आणि किती रुपयांची सुपारी दिली होती?

A

भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी ५० हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती, तर शुभम चव्हाणचा बेस्ट फ्रेंड असलेल्या ओंकार उर्फ बब्या पवार याने मध्य प्रदेशातील उमरटी येथून प्रत्येकी २५ हजार रुपयांना पिस्तुले आणली होती.

Q

Q3. शुभम चव्हाण खून प्रकरण नेमके कशामुळे घडले होते?

A

कात्रजमधील संतोषनगर येथे घराशेजारील दोन गुंठे जमिनीतील अर्ध्या गुंठ्याच्या मालकीवरून सुरू झालेल्या वादातून २० एप्रिल २०२५ रोजी लाकडी ओंडके, बांबू व स्टंपने मारहाण करून शुभम चव्हाणचा खून करण्यात आला होता.