रात्री रिक्षा चालवण्यासाठी गेला अन् सकाळी कॅनॉलमध्ये सापडला मृतदेह; परभणीत अनैतिक संबंधातून रिक्षाचालकाचा भयानक अंत!

रात्री रिक्षा चालवण्यासाठी गेला अन् सकाळी कॅनॉलमध्ये सापडला मृतदेह! परभणीत अनैतिक संबंधांच्या वादातून महिलेने दोन अल्पवयीन मुलांसह रचला हत्येचा कट; चाकू व रॉडने वार करून जखमी अवस्थेतच रिक्षासह फेकलं.
Rickshaw Driver Murder
सौजन्य फोटो - AI GeminiRickshaw Driver Murder
Published on: 
Updated on: 
  • परभणीतील बलसा खुर्द कॅनॉलमध्ये रिक्षाचालकचा मृतदेह आणि रिक्षा सापडली

  • अनैतिक संबंधांच्या वादातून महिलेने दोन मुलांसह रिक्षाचालकाला रिक्षासह कॅनॉलमध्ये फेकले

  • कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करत महिलेसह दोघांना घेतले ताब्यात

परभणी: परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता. तरुणाच्या अंगावर मारहाणीच्या गंभीर खुणा होत्या आणि मारहाण करून त्याला कालव्यात फेकून देण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत सखोल तपास केला असता पूर्वनियोजित हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं असून, पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

Rickshaw Driver Murder
रात्रीच्या अंधारात वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर दगडांचा वर्षाव! समृद्धी महामार्गावर ८ ते १० वाहनांवर दगडफेक

रात्री रिक्षा चालवण्यासाठी गेला अन् सकाळी कॅनॉलमध्ये मृतदेह

युनुस शेख युसुफ (वय ३२, रा. परभणी) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मयत युनुस यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, युनुस २४ नोव्हेंबर रोजी रात्री ऑटो रिक्षा चालवण्यासाठी जातो, असं सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, रात्र उलटूनही तो घरी परतला नाही आणि त्याचा मोबाईल फोनही बंद लागत होता. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण त्याचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.

दुसऱ्या दिवशी, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बलसा खुर्द गावाच्या शिवारातील कॅनॉलमध्ये युनुसचा मृतदेह आणि रिक्षा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राचे आणि पाठीवर चाकूने वार केल्याचे गंभीर घाव होते. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता युनुस याचं एका महिलेसोबत मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं.

Rickshaw Driver Murder
भटकी कुत्री मागे लागताच जीवाच्या आकांताने पळाला अन्... अवघ्या १८ वर्षांच्या बारावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने

महिलेच्या चौकशीतून हत्येचा उलगडा

पोलिसांनी दर्गा रोड परिसरातील एका संशयित महिलेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता हत्येचा संपूर्ण कट उघड झाला. मृत युनुससोबतच्या वादाचा राग मनात धरून संबंधित महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांनी संगनमत करून युनुसवर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेतच त्याला रिक्षासह कॅनॉलमध्ये फेकून दिलं.

तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, संशयित महिलेसह अन्य दोन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलपत्रेवार यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Q

परभणीत हत्या झालेल्या रिक्षाचालकाचे नाव काय आणि त्याचा मृतदेह कोठे सापडला?

A

हत्या झालेल्या तरुणाचे नाव शेख युनुस शेख युसुफ (वय ३२) असे असून, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बलसा खुर्द गावाच्या शिवारातील कॅनॉलमध्ये त्याचा मृतदेह आणि रिक्षा आढळून आली.

Q

या हत्येमागील मुख्य कारण काय समोर आले आहे?

A

मागील दोन वर्षांपासूनच्या अनैतिक संबंधांच्या वादातून दर्गा रोड परिसरातील एका महिलेने तिच्या दोन अल्पवयीन मुलांसह संगनमत करून ही पूर्वनियोजित हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे.

Q

पोलिसांनी या प्रकरणात कोणाकोणाला ताब्यात घेतले आहे?

A

कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) हत्येचा गुन्हा दाखल करून संशयित महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.