(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी टेलिव्हिजनचा सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सीझन ६ आता शेवटच्या टप्प्यात आहे. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या घरात टॉप ५ स्पर्धक आहेत. लवकरच महाराष्ट्राला सीझन ६ चा विजेता मिळणार आहे. यावेळी बिग बॉस मराठी सीझन ६ चा विजेता कोण होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टॉप ५ स्पर्धकांच्या प्रवासाला खास रंगत आणण्यासाठी बिग बॉस मराठीच्या मागील सिझनमधील काही जुन्या स्पर्धकांना बिग बॉसच्या पुन्हा एकदा या जादुई घरात जाण्याची संधी मिळाली आणि याच संधीच सोनं करत गायक अभिजीत सावंत ने घरातल्या सगळ्या मित्र मैत्रिणी ना सुखद धक्का दिला आहे. घरात जाऊन त्याने एक खास गाणं देखील परफॉर्म केलं आणि पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकून घेतली.
अभिजीत मागच्या पर्वाचा उपविजेता ठरला आणि त्याने जगभरातील प्रेक्षकांना बिग बॉस मधून भुरळ घातली होती आणि आता अभिजीतला पुन्हा एकदा या घरात जाण्याची संधी बिग बॉस मराठीमुळे मिळाली. घरात जाऊन बाकी मित्र मैत्रिणी ना सल्ले तर दिले पण त्याने अशी एक अनपेक्षित गोष्ट केली ज्याने घरातली सगळे सदस्य आणि प्रेक्षकांना सुखद धक्का बसला आहे.
बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमो मध्ये अभिजीत ने घरात जाऊन घरातल्या सगळ्यांसाठी ” तुम बिन” सिनेमातील एक खास गाणं गायलं आहे. हा क्षण अगदी सगळ्यांना मंत्रमुग्ध करणार आहे यात शंका नाही. आजवर अभिजीत ने जगभरातील प्रेक्षकांना त्याचा सुमधुर आवाजाने भुरळ घातली आहे आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात देखील त्याचा जादुई आवाजाने प्रेक्षक खुश होणार आहेत.
स्पर्धकाप्रमाणेच त्यांचे चाहते देखील कोण विनर होणार याची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी वोट करत आहे. रविवारी 19 एप्रिल ला बिग बॉस मराठी सीझन ६ चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यामुळे आता फक्त प्रतीक्षा आहे त्या क्षणाची, ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय.






