(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
एंडेमोल शाइन इंडिया (बनिजे ग्रुपचा भाग) निर्मित बिग बॉस मराठी सीझन 6 हा एक मोठा आणि लोकप्रिय रिअॅलिटी शो ठरला आहे. या शोने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.अभिनेता Riteish Deshmukhच्या जबरदस्त होस्टिंगमुळे शोला अजूनच रंग चढला आणि तो महाराष्ट्रभर खूप गाजला. या सीझनमध्ये भांडणं, कठीण टास्क, मजेशीर क्षण आणि अचानक येणारे ट्विस्ट्स यामुळे प्रेक्षक सतत उत्सुक राहिले.घरातील बदलणारी नाती, नवीन एंट्रीज आणि मोठे वाद यामुळे हा शो नेहमीच चर्चेत राहिला आणि लोकांना टीव्हीसमोर खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला.
सीझन 6 आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, ग्रँड फिनाले 19 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. भावना उंचावलेल्या आणि स्पर्धा शिगेला पोहोचलेली असताना, या सीझनला खास बनवणाऱ्या पाच अविस्मरणीय क्षणांकडे एक नजर टाकूया:
बिग बॉस मराठीच्या घरातील पाच अविस्मरणीय क्षण
1) Rakhi Sawant ची धमाकेदार एंट्री आणि त्यानंतरचा राडा
राखी सावंतने वाइल्डकार्ड एंट्री घेताच घरात अक्षरशः खळबळ उडवली. Raqesh Bapat ला “एक्स-जिजू” म्हणण्यापासून ते पहिल्याच दिवशी घरकाम नाकारण्यापर्यंत, तिने घरात पूर्ण गोंधळ घातला. तिचे विनोदी टोमणे, सततचे चिथावणीखोर वर्तन आणि बदलणारे नातेसंबंध यामुळे खेळाची दिशा पूर्णपणे बदलली.
2) Raqesh Bapat आणि Vishal Kotian यांच्यातील मोठा वाद
नॉमिनेशन टास्कदरम्यान विशाल कोटियन आणि राकेश बापट यांच्यात झालेला वाद हा या सीझनमधील सर्वात धक्कादायक क्षणांपैकी एक होता. साध्या वादातून सुरू झालेली ही भांडणं वैयक्तिक विषयांपर्यंत पोहोचली—ज्यात घटस्फोट आणि वय यांसारख्या गोष्टी ओढल्या गेल्या. परिस्थिती इतकी बिघडली की ती हातघाईपर्यंत गेली, ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आणि बिग बॉसला हस्तक्षेप करावा लागला.
3) फायनलिस्ट Tanvi Kolte ची ‘टास्क क्वीन’ कामगिरी
तन्वी कोलते ही या सीझनमधील पहिली फायनलिस्ट ठरली आणि तिने ‘टास्क क्वीन’ ही ओळख सार्थ ठरवली. जवळजवळ प्रत्येक टास्कमध्ये तिने उत्कृष्ट कामगिरी केली, दोन वेळा कॅप्टन बनली आणि संपूर्ण खेळात सातत्य राखले. तिची खासियत म्हणजे ताकदीसोबत बुद्धीचा वापर करून स्मार्ट गेम खेळणे.
4) Deepali Sayyad – Rakhi Sawant यांची भन्नाट केमिस्ट्री
या सीझनमधील एक खास आकर्षण म्हणजे दीपाली सय्यद आणि राखी सावंत यांची अनोखी केमिस्ट्री. कधी तीव्र भांडणं तर कधी मजेशीर क्षण—त्यांचं नातं कायमच अनपेक्षित आणि मनोरंजक राहिलं. टास्कदरम्यानही त्यांची गोंधळलेली पण मजेशीर जुगलबंदी प्रेक्षकांना खूप आवडली.
200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात Jacqueline Fernandez सरकारी साक्षीदार होणार? कोर्टाची ईडीला नोटीस
5) धक्कादायक एलिमिनेशन्स आणि फायनलिस्ट्स
बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये अनेक धक्कादायक एलिमिनेशन्स पाहायला मिळाले, विशेषतः “भाऊचा धक्का” दरम्यान, ज्याचे सूत्रसंचालन Riteish Deshmukh करत होते. Reva Kaurase, Rakhi Sawant, Sagar Karande, Karan Sonawane, Ayush Sanjeev आणि Sanket Pathak यांसारख्या स्पर्धकांचे अनपेक्षित बाहेर पडणे प्रेक्षकांना सतत चकित करत राहिले.
सर्व ड्रामा आणि एलिमिनेशन्सनंतर, अंतिम पाच स्पर्धक—Tanvi Kolte, Raqesh Bapat, Vishal Kotian, Anushri Mane आणि Deepali Sayyad यांनी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. ज्यामुळे आता ग्रँड फिनाले अधिकच रोमांचक होणार असून या सीझनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता अख्ख्या महाराष्ट्राला लागली आहे.






