इंदिरा गांधी (Indira Gandhj) पंतप्रधान झाल्यानंतर लगेचच, मार्च 1966 मध्ये मिझोरामची (mizoram) राजधानी आयझॉलवर (Aizawl) हवाई दलाने केलेल्या बॉम्बफेकीच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय वाद आणखी वाढला. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (amit malviya) यांनी सचिन पायलटचे (Sachin Pilot) वडील राजेश पायलट (rajesh pilot) आणि काँग्रेस नेते सुरेश कलमाडी यांचा 5 मार्च 1966 रोजी आयझॉल बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांनी अमित मालवीय यांच्यावर प्रत्युत्तर देत त्यांचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे.
[read_also content=”काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहून शेहला रशीद यांनी मोदी सरकारंच केलं कौतुक, म्हणाल्या, ‘हा तर नवा काश्मीर’ https://www.navarashtra.com/india/shehla-rashid-talk-about-jammu-and-kashmir-and-narendra-modi-nrps-445278.html”]
अमित मालवीय यांच्या ट्विटवर सचिन पायलट यांनी प्रत्युत्तराता त्यांचा दावा फेटाळला आहे . सचिनने लिहिले- एअरफोर्स पायलट म्हणून माझ्या दिवंगत वडिलांनी 1971 च्या भारत-पाक युद्धात पूर्व पाकिस्तानमध्ये बॉम्बफेक केली होती. 1966 मध्ये मिझोराममध्ये नाही. स्व. राजेश पायलटजी 29 ऑक्टोबर 1966 रोजी भारतीय वायुसेनेत दाखल झाले. 5 मार्च 1966 ला त्यांनी मिझोरामवर बॉम्ब टाकला हे चुकीचे आणि पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. 80 च्या दशकात राजकारणी म्हणून त्यांनी मिझोराममध्ये युद्धविराम आणि कायमस्वरूपी शांतता करार प्रस्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती असं ते म्हणाले.
आयझॉल ऑपरेशनचा संदर्भ देत, अमित मालवीय यांनी ट्विट केलं की, राजेश पायलट आणि सुरेश कलमाडी भारतीय वायुसेनेची विमाने उडवत होते ज्यांनी 5 मार्च 1966 रोजी आयझॉलवर बॉम्ब टाकले. नंतर दोघेही काँग्रेसच्या तिकिटावर खासदार आणि सरकारमध्ये मंत्री झाले. ज्यांनी ईशान्येत आपल्याच लोकांवर हवाई हल्ले केले त्यांना इंदिरा गांधींनी राजकारणात स्थान दिले आणि त्यांना आदर दिला हे स्पष्ट आहे.
राजेश पायलट और सुरेश कलमाड़ी भारतीय वायुसेना के उन विमानों को उड़ा रहे थे जिन्होंने 5 मार्च 1966 को मिज़ोरम की राजधानी आइज़वाल पर बम गिराये। बाद में दोनों कांग्रेस के टिकट पर सांसद और सरकार में मंत्री भी बने।
स्पष्ट है कि नार्थ ईस्ट में अपने ही लोगों पर हवाई हमला करने वालों को… pic.twitter.com/eXjQ33XUwe
— Amit Malviya (@amitmalviya) August 13, 2023