अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला, जाणून घ्या ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय?

या बॉक्सला जरी ब्लॅक बॉक्स बोललं जात असलं तरी, हा बॉक्स सहसा केशरी रंगाचा असतो. हे स्टील आणि टायटॅनियमचे बनलेले रेकॉर्डिंग उपकरण आहे. यामध्ये अनेक प्रकारचे सिग्नल, संभाषण आणि तांत्रिक डेटा रेकॉर्ड केला जातो. यामध्ये दोन प्रकारचे रेकॉर्डर आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR). पहिला रेकॉर्डर दर सेकंदाला विमान किंवा हेलिकॉप्टरची उंची, वाऱ्याचा वेग आणि इंधन पातळी अशा अनेक गोष्टींची नोंद करतो. त्याची रेकॉर्डिंग स्टोरेज क्षमता 24 तासांपेक्षा जास्त आहे. दुसरा रेकॉर्डर म्हणजेच CVR कॉकपिटमधील संभाषण आणि इतर आवाज देखील रेकॉर्ड करतो.
black box
Published on: 
Updated on: 

तामिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झालेल्या Mi-17VH हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. प्रत्येक विमान अपघातानंतर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या या बॉक्सचे खरे नाव फ्लाइट रेकॉर्डर आहे. यामध्ये पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) यांच्यातील संभाषणापासून ते अपघात होण्यापूर्वीच्या वेळेपर्यंतचा महत्त्वाचा डेटा रेकॉर्ड केला जातो. या डेटाच्या मदतीने अपघाताचे खरे कारण शोधता येईल.

अपघाताची चौकशी करणाऱ्या लष्करी पथकांनी हेलिकॉप्टरचे अवशेष आणि उपकरणे शोधण्यासाठी एक किलोमीटरच्या परिघात सखोल शोध मोहीम सुरू केली होती. यादरम्यान हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स सापडला. कोणत्याही अपघाताची कारणे शोधण्यासाठी त्यातील डेटा सर्वात प्रामाण मानला जातो. मात्र, खराब हवामान आणि डोंगराळ भागात कमी दृश्यमानता यामुळे बुधवारची दुर्घटना घडल्याचा अंदाज बहुतांश तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र अपघाताचे अधिकृत कारण समोर आलेलं नाही. जनरल रावत यांचं लष्करातील स्थान पाहता एखादा कट असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

या बॉक्सला जरी ब्लॅक बॉक्स बोललं जात असलं तरी, हा बॉक्स सहसा केशरी रंगाचा असतो. हे स्टील आणि टायटॅनियमचे बनलेले रेकॉर्डिंग उपकरण आहे. यामध्ये अनेक प्रकारचे सिग्नल, संभाषण आणि तांत्रिक डेटा रेकॉर्ड केला जातो. यामध्ये दोन प्रकारचे रेकॉर्डर आहेत. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR). पहिला रेकॉर्डर दर सेकंदाला विमान किंवा हेलिकॉप्टरची उंची, वाऱ्याचा वेग आणि इंधन पातळी अशा अनेक गोष्टींची नोंद करतो. त्याची रेकॉर्डिंग स्टोरेज क्षमता 24 तासांपेक्षा जास्त आहे. दुसरा रेकॉर्डर म्हणजेच CVR कॉकपिटमधील संभाषण आणि इतर आवाज देखील रेकॉर्ड करतो.

दरम्यान, आता हा ब्लॅक बॉक्स मिळाला असल्याने या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.