FSSAI Action Against Bisleri: बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखल

FSSAI Action Against Bisleri: पहिल्या तपासणीत बिस्लेरीच्या पाण्यात ब्रोमेटची पातळी कायदेशीर परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आली आहे. ब्रोमेटचे अतिरिक्त प्रमाण मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते.
Bisleri Water Unsafe To Drink FSSAI Action Food Safety Act 2006
बापरे...! बिस्लेरीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत घटक; कंपनीवर गुन्हा दाखलFSSAI Action Against Bisleri, FSSAI Action Against Bisleri, Bisleri Water Samples Fail Quality Test
Published on: 
Updated on: 

FSSAI Action Against Bisleri: देशातील सर्वात मोठी पाणी कंपनी असलेल्या बिस्लेरीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. अन्न सुरक्षेसाठी जबाबदार असलेली सरकारी संस्था, FSSAI ने, बिस्लेरीच्या पाण्याच्या नमुन्यांची दोनदा चाचणी अयशस्वी झाल्यानंतर कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास मंजुरी दिली. म्हणजेच बिस्लेरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे आढळले आहे.

पहिल्या चाचणीत पाण्यात ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले, जे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. कंपनीने यावर आक्षेप घेतला आणि दुसरी चाचणी घेण्यात आली, परंतु त्यातही पाणी असुरक्षित आढळले. यावेळी, PAHs नावाचे कर्करोगास कारणीभूत घटक देखील आढळले. विशेष म्हणजे, पाण्याचे नमुने बाजारातून नव्हे, तर बिस्लेरीच्या आवारातून गोळा करण्यात आले होते, असेही सांगण्यात आले.

Health Update: डेंग्यूच्या एलायझा नोंदींत १३, तर लेप्टोमध्ये ३९% घट! डेंग्यूचा सप्टेंबरमध्ये, तर लेप्टोचा

बिस्लेरीचे पाणी पिण्यास अयोग्य - FSSAI

बिस्लेरीवर केलेल्या कारवाईबाबत, एफएसएसएआयने दिलेल्या माहितीनुसार, ब्रोमेट आणि PAHs दोन्ही कर्करोगास कारणीभूत पदार्थ म्हणून वर्गीकृत केले जातात. हे पाणी पिण्यास अयोग्य असून अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कंपनीवर गुन्हा दाखल केला जाईल. पण कंपनीने अद्याप कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

५० वर्षांहून अधिक जुन्या या ब्रँडवरील कारवाईने लोकांना आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एफएसएसएआयने केवळ बिस्लेरीवरच नव्हे, तर इतर कंपन्यांवरही कारवाई केली आहे. एफएसएसएआयने वसंत मसाला प्रायव्हेट लिमिटेड, टिट-बिट फूड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मीमांसा इंडस्ट्रीज आणि आशा कन्फेक्शनरी यांसारख्या इतर अन्न कंपन्यांवरही गुन्हे दाखल केले आहेत आणि उत्पादने परत मागवण्याचे आदेश जारी केले आहेत.

अनेक कंपन्यांचे परवाने निलंबित

एफएसएसएआयने नियमांचे पालन न केल्यामुळे उर्मी लाइफसायन्सेस आणि गौर आयुर्वेदिक स्टोअर्स यांचे परवाने निलंबित केले आहेत. एफएसएसएआयने आशा कन्फेक्शनरीविरुद्ध उत्पादन परत मागवण्याचा आदेश जारी केला असून, कंपनीला तिची पॅकबंद चॉकलेट भरलेली बिस्किटे असुरक्षित आढळल्यानंतर ती परत मागवण्याचे निर्देश दिले आहेत.

Jagadish Chandra Bose: सर जगदीशचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी; जाणून घ्या 23 नोव्हेंबरचा इतिहास..

Q

एफएसएसएआयने (FSSAI) बिस्लेरी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे कारण काय?

A

बिस्लेरीच्या आवारातून गोळा करण्यात आलेल्या पाण्याचे नमुने सलग दोनदा गुणवत्ता चाचणीत नापास झाले असून, त्यामध्ये आरोग्यास घातक घटक आढळले आहेत. हे पाणी पिण्यास अयोग्य ठरल्याने FSSAI ने गुन्हा दाखल करण्यास मंजुरी दिली आहे.

Q

बिस्लेरीच्या पाण्याच्या दोन्ही चाचण्यांमध्ये नेमके कोणते घटक आढळले?

A

पहिल्या चाचणीत पाण्यात ब्रोमेटची पातळी परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळून आली. तसेच कंपनीच्या आक्षेपानंतर घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीत कर्करोगास कारणीभूत ठरणारे PAHs घटक आढळून आले.

Q

कोणत्या कायद्यांतर्गत बिस्लेरीविरुद्ध कारवाई केली जाणार आहे?

A

अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ (Food Safety and Standards Act, 2006) अंतर्गत बिस्लेरी कंपनीवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.