
Nako Ha Bahana
गुलाबी रंगाचा फेब्रुवारी महिना युवक, युवती प्रेमाचा महिना म्हणून साजरा करतात. एकमेकांना गिफ्ट देणं, डेटवर जाणं, समुद्रकिनारी बसून गप्पा मारणं अशा अनेक माध्यमातून आपलं प्रेम व्यक्त करतात. या महिन्याचं मुख्य आकर्षण असतं तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे (Valentine Day 2022). येत्या १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डेचं अजून एक खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे याच दिवशी झी म्युझिक मराठी (Zee Music Marathi) घेऊन येत आहे एक नवीन मराठी म्युझिक अल्बम (Nako Ha Bahana) ‘नको हा बहाणा’.
या गाण्यामध्ये अभिनेता निखिल चौधरी (Nikhil Chaudhary) आणि अभिनेत्री गायत्री दातार(Gayatri Datar) यांची गोड जोडी प्रेक्षकांना बघायला मिळेल. या गाण्याचं पोस्टर रिलीज झालं असून, सोशल मीडियावर या गाण्यासाठी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता दिसून येत आहे.
[read_also content=”‘राहुल बजाज यांच्या जाण्याने राज्याच्या उद्योगविश्वाचे नुकसान’, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत – शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना https://www.navarashtra.com/maharashtra/chief-minister-uddhav-thackeray-reaction-about-rahul-bajaj-death-nrsr-237136/”]
निमिषा चौधरी प्रस्तुत, सौरभ चौघुले दिग्दर्शित ‘नको हा बहाणा’ हे गाणं देव अहिरराव यांनी गायलं असून, संगीतही त्यांनीच दिलं आहे. संकेत जाधव यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे, तर राहुल दास यांनी या गाण्याचं छायाचित्रण केलं आहे.