सकाळी झोपेतून उठल्यानंतर तोंडाची चव खराब होते? शरीरसंबंधित असू शकतात 'या' गंभीर आजाराचे संकेत, जाणून घ्या सविस्तर
जिभेची चव कशामुळे बिघडते?
पोट स्वच्छ करण्यासाठी काय करावे?
लिव्हरमुळे का बदलते तोंडाची चव?
दैनंदिन आहारात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, झोपेचा अभाव, वारंवार बिघडलेली पचनक्रिया इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर तोंडात कडवटपणा जाणवून तोंड कडू होऊन जाते. तर काहीवेळा तोंडाची चव कडू, तुरट आणि वेगवेगळी लागते. ही कोणतीही सामान्य समस्या नसून शरीरसंबंधित गंभीर आजाराचे संकेत आहेत. तोंडाची चव बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीराची बिघडलेली पचनक्रिया. आहारात सतत तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन करण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. ज्यामुळे अन्नपदार्थ पचन होण्याऐवजी अन्ननलिकेमध्ये पुन्हा परत येतात. चला तर जाणून घेऊया सकाळी उठल्यानंतर तोंडाची चव कशामुळे बिघडते? जाणून घ्या यामागील कारण.(फोटो सौजन्य – istock)
तोंडाची चव बिघडण्यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात. पचन समस्या, लिव्हरसंबंधी समस्या, तोंडाची अस्वच्छता आणि जास्त गॅस किंवा ऍसिड वाढल्यामुळे शरीरात विषारी घटक मोठ्या प्रमाणावर जमा होतात. याशिवाय आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीचा परिणाम संपूर्ण शरीरावर लगेच दिसून येतो. आंबट ढेकर येणे, घशात वाढलेली जळजळ इत्यादी कारणांमुळे तोंडाची चव बिघडण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी तोंडाच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
लिव्हर शरीरातील असंख्य कामे करते. शरीरातील घाण बाहेर काढून टाकणे, रक्त शुद्ध करणे, चांगले कोलेस्ट्रॉल तयार करणे इत्यादी कामे लिव्हर करते. पण चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणाऱ्या बदलांमुळे लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. ज्यामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहतात. लिव्हरच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर तोंडाची चव बदलू लागते. कारण लिव्हरचे काम कमी झाल्यामुळे शरीरातील रक्त व्यवस्थित शुद्ध होत नाही. लिव्हर अन्न पचनासाठी आवश्यक एंझाइम सुद्धा तयार करत नाही. याचा परिणाम शरीराच्या पचनक्रियेवर होतो. बद्धकोष्ठता, अपचन इत्यादी कारणांमुळे सकाळी उठल्यानंतर तोंडाला खूप जास्त दुर्गंधीचा वास येतो.
तोंडाची चव खराब होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे दैनंदिन आहारात सतत मसालेदार आणि अतितिखट पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न देणे. तोंड व्यवस्थित स्वच्छ न केल्यामुळे अन्नाचे कण तोंडाचे आणि दातांचे नुकसान करू टाकतात. तोंडाची चव बिघडल्यानंतर आणि पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीरात अनेक बदल होतात.
घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत
तोंडाची चव बिघडल्यानंतर ती पुन्हा सुधारण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात त्रिफळा पावडर मिक्स करून प्यावे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते. याशिवाय पोट स्वच्छ करण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी उपाशी प्यावे. जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच तोंडाची चव सुद्धा चांगली राहते.
Ans: सकाळी तोंडाची चव खराब होण्यामागे तोंडातील बॅक्टेरिया, अपुरी स्वच्छता, पचनसंस्थेचे विकार किंवा ऍसिड रिफ्लक्स (acid reflux) ही कारणे असू शकतात.
Ans: तोंडाची कडू किंवा वाईट चव ही Gastroesophageal Reflux Disease (GERD), लिव्हरचे आजार, किडनीचे विकार, मधुमेह किंवा सायनस इन्फेक्शन यांचे संकेत असू शकतात.
Ans: धूम्रपान टाळणे, मद्यपान कमी करणे, योग्य आहार घेणे आणि नियमित तोंडाची स्वच्छता राखणे यामुळे हा त्रास कमी होतो.






